Budget 2022 :तणाव, नैराश्यमुक्तीसाठी विशेष कार्यक्रम राबवणार; सीतारमण यांची मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात (Budget 2022) अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थमंत्र्यांनी आरोग्यावर(Health) विशेष लक्ष केंद्रित करून नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू करण्याविषयी सांगितले.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात (Budget 2022) अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थमंत्र्यांनी आरोग्यावर(Health) विशेष लक्ष केंद्रित करून नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू करण्याविषयी सांगितले. आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत यासारख्या मोठ्या घोषणा यावेळी निर्मला सीतारमन यांनी केल्या.
1.अर्थमंत्री म्हणाल्या की, महामारीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमात मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या 23 संस्थांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.
2. नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम लाँच केले जाईल. याद्वारे नागरिकांना अनेक प्रकारची माहिती मिळेल. विशेष म्हणजे याच्या मदतीने आरोग्य पुरवठादारांची माहिती उपलब्ध होणार आहे, सरकार सर्वसामान्यांना कोणत्या आरोग्य सुविधा देत आहे, याचा हिशेब मिळेल.
3. नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टममध्येच प्रत्येक नागरिकाला एक वेगळी आरोग्य ओळख मिळेल. म्हणजेच तुमच्या आरोग्याचा सर्व डेटा घेतला जाईल.
4. तणाव, नैराश्य आणि अस्वस्थता यांसारख्या समस्यांवर लोक बोलू शकतात आणि अशा मानसिक विकारांवर उपचार करता येतात, यासाठी तज्ज्ञांशी फोनवर संभाषण करता येईल.
5. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, जगभरात मानसिक आजारांशी संबंधित केस वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जाणवत आहे. मानसिक विकारांची बहुतेक केस नैराश्यातून येतात. हा सर्वात सामान्य मानसिक विकार आहे.
6.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, बहुतेक महिला नैराश्याने ग्रस्त आहेत. संशोधन अहवालात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात नैराश्य, तणाव आणि अस्वस्थतेच्या केस वाढल्या आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल टेली-मेंटल हेल्थच्या मदतीने लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
संबंधित बातम्या :
Budget 2022: 80 लाख घरे बांधणार, लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटी; वाचा बजेटमधील 25 मोठ्या घोषणा
Budget 2022| महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करणार, 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार- अर्थमंत्री