नवी दिल्ली : मार्च 2020 पासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे (Corona) दोन वर्षांपासून विविध क्षेत्र प्रभावित झालेली आपल्याला दिसून आली आहेत. कोरोना संसर्गाचा पर्यटन क्षेत्रावर (Tourism) देखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून आलंय. पर्यटन क्षेत्राला अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून सादर केल्या जाणाऱ्या 2022 च्या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत. झी बिझनेसच्या रिपोर्टमध्ये रॉयल ऑर्किड हॉटेलचे सीईओ अमित जैस्वाल यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये देशांतर्गत पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ पाहायला मिळाल्याचं सांगितलं. पर्यटन क्षेत्र देशांतर्गत पर्यटनामुळेच टिकून राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केले. जे लोक यापूर्वी थायलंड, मलेशिया आणि श्रीलंका अशा देशांमध्ये पर्यटनासाठी जात होते. ते आता आपल्या देशामध्ये पर्यटन करत आहेत. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कर कमी केले पाहिजेत असं जयस्वाल यांनी म्हटलंय.
एबिक्सकॅश ट्रॅव्हल सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर नवीन कुंडू यांनी सरकारने पर्यटन क्षेत्राला प्रायोरिटी सेक्टरचा दर्जा द्यावा, असं म्हटलंय. हॉटेलवर लावण्यात आलेला 18% जीएसटी कमी करावा असं देखील त्यांनी सरकारकडे साकडं घातलंय. जादा करांमुळे हॉटेल्सचं भाड वाढत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. वाढत्या करांचा पर्यटकांवर याचा परिणाम होतो. जर हॉटेल्सचं भाडं एक हजार रुपये असेल तर कोणताही टॅक्स लागत नाही. मात्र, 1000 ते 7500 मध्ये भाडं असल्यास 12 टक्के जीएसटी लागतो. याशिवाय 7500 पेक्षा जास्त असल्यास 18% जीएसटी लागतो.
भारतीय ट्रॅव्हल एजंट संघ यांनी वन नेशन वन टॅक्सच्या प्रमाणे वन नेशन वन टुरिझम ऍप्रोच स्वीकारण्याची गरज असल्याचे म्हटलं. याशिवाय भारतीय ट्रॅव्हल एजंट संघाने विमानांचे इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यामुळे सर्वांसाठी विमान सेवेचा लाभ घेणे सोपे होईल, असं म्हटलंय. या शिवाय आपत्कालीन कर्ज गॅरंटी योजनेची कक्षा देखील वाढवावी ,असं त्यांनी म्हटलं. ज्योती मयाल यांनी पर्यटन आणि हॉस्पिटलिटी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे म्हटलं. पर्यटन क्षेत्र सध्या अनेक संकटातून पुढे जात आहे त्यामुळे एक भारत एक पर्यटन अशी संकल्पना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर बातम्या:
Budget 2022: डिजिटल आरोग्य सेवा ते टेलि-मेडिसिन, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला झुकतं माप?
Budget 2022 : शेअर गुंतवणुकदारांना कर दिलासा की बोजा; टॅक्सचा ट्रिपल डोस हटविणार?
Budget 2022 tourism sector expectations from Nirmala Sitharaman demanding GST tax relief and priority sector status