Budget 2023 : भारतीय रेल्वे सुस्साट, 75000 नोकऱ्या मिळणार; निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा

पशुपालन, डेअरी आणि मत्स्यपालनावर ध्यान दिलं जाईल. कृषी कर्जाचं टार्गेट वाढवून 20 लाख कोटी केलं जाणार आहे. सरकार हैद्राबादेतील बाजरा संस्थेचा उत्कृष्ट केंद्र म्हणून विकास करेल.

Budget 2023 : भारतीय रेल्वे सुस्साट, 75000 नोकऱ्या मिळणार; निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा
अर्थसंकल्पात महिलांसाठी नवी बचत योजनाImage Credit source: sansad tv
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 12:01 PM

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे आता सुस्साट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.4 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत 75000 नवी नोकर भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या.

रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच ट्रांसपोर्ट इंफ़्रासाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकाला पॅकेज

यावेळी निर्मला सीतारामण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अनुसूचित जनजातींसाठी 15000 कोटी रुपये दिले जाणार आहे. पीएम आवास योजनेसाठी 66 टक्के निधी वाढवला जाईल. तसेच पीएम आवास योजनेसाठी 79 हजार कोटींचा फंड दिला जाणार आहे. याशिवाय कर्नाटकातील दुष्काळासाठी 5300 कोटी वितरीत केले जाणार आहेत, असं सीतारामण यांनी सांगितलं.

वयाच्या हिशोबाने पुस्तकं देणार

मुलं आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी तयार केली जाईल. नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड लेव्हला उघडण्यात येईल. या ग्रंथालयात प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके मिळतील. प्रत्येक वयाच्या हिशोबाने पुस्तकं दिली जाणार आहे. राज्यांना पुस्तकालये तयार करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

38800 मॉडेल स्कूल तयार करणार

पशुपालन, डेअरी आणि मत्स्यपालनावर ध्यान दिलं जाईल. कृषी कर्जाचं टार्गेट वाढवून 20 लाख कोटी केलं जाणार आहे. सरकार हैद्राबादेतील बाजरा संस्थेचा उत्कृष्ट केंद्र म्हणून विकास करेल. देशभरात 38800 टीचर एकलव्य मॉडेल स्कूल तयार केली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

शेतीसाठी फंड देणार

केंद्र सरकारने जुन्या गाड्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांना ट्रेनिंगसाठी 30 स्किल इंडिया सेंटर उभारणार, महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणार, शेतीसाठी विशेष फंड देणार, शेतकऱ्यांना विशेष ट्रेनिंग देणार, आदी घोषणाही त्यांनी केल्या.

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.