Budget 2024 | रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, रेल्वे कोच वंदेभारत सारखे होणार

| Updated on: Feb 01, 2024 | 12:58 PM

FM Nirmala Sitharaman Speech on Budget 2024 | भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शक पद्धतीने काम सुरु आहे. देशातील रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहे. देशात लोकप्रिय ठरलेली वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे इतर गाड्यांचे कोच होणार आहे.

Budget 2024 | रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, रेल्वे कोच वंदेभारत सारखे होणार
Follow us on

नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी भारतील रेल्वेत केलेल्या बदलांची माहिती दिली. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे कोच आलिशान आहे. त्याचप्रमाणे आता इतर रेल्वे गाड्यांच्या कोचची निर्मिती करण्यात येणार आहे. आता भरतीय रेल्वेचे 40 हजार नॉर्मल रेल कोच वंदे भारतमध्ये बदलण्यात येणार आहे.

रेल्वेमध्ये चांगले बदल

देशात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरु झाली. १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये ही रेल्वे सुरु झाले. त्यानंतर देशभरातील अनेक मार्गांवर वंदे भारत धावू लागल्या आहेत. या गाड्यांना प्रवाशांची चांगली पसंती मिळाली आहे. आता वंदे भारत एक्प्रेसचे स्लिपर कोचसुद्धा येत आहे. यामुळे या गाड्यांप्रमाणे इतर गाड्यांचे कोच बदलण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केला. सध्या चेन्नई-म्हैसूर रूट, चेन्नई-तिरुनलवेली, चेन्नई-कोयंबट्टूरर, तिरुवनंतपूरम-कासरगोड, चेन्नई-विजयवाडा या मार्गांवर विमानाप्रमाणे सुविधा वंदे भारत रेल्वेमधून दिल्या जात आहे.

काय म्हटले निर्मला सीतारमण

देशाच्या विकासासाठी भारतीय रेल्वेची महत्वाची भूमिका आहे. यामुळे रेल्वेच्या सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या जात आहेत. नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहेत. रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. वंदे भारत ही सेमी हाय-स्पीड ट्रेन्स आहे. त्याची संख्या आणखी वाढली जाणार आहे. तसेच वंदे भारत ट्रेन आता चेअर कार प्रमाणे स्लीपर कोचही करण्यात येणार आहे. ही रेल्वे राजधानी एक्स्प्रेसपेक्षा अधिक आरामदायक आणि सुविधाजनक असणार आहे.

हे सुद्धा वाचा

निर्मला सीतारमण यांनी सरकारकडून सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांमुळे देशात किती बदल झाला, त्याची आकडेवारी सादर केली. अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे सकाळी ११ वाजता सुरु झालेले अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण १२ वाजता पूर्ण झाले.

हे ही वाचा

आयकरदात्यांना अर्थमंत्र्यांनी काय दिले, करपद्धतीत काय केला बदल