Budget 2023 | इनकम टॅक्स जाहीर होताच शेअर बाजारात तेजी; सेंसेक्समध्ये 1100 अंकांनी वाढला

बजेटच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात जबरदस्त झाली. सततचा तोटा सहन कराव्या लागणाऱ्या गुंतवणूकदारांना आज दिलासा मिळाला आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना काही मिनिटांत सुमारे 1.50 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

Budget 2023 | इनकम टॅक्स जाहीर होताच शेअर बाजारात तेजी; सेंसेक्समध्ये 1100 अंकांनी वाढला
Sensex Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 1:32 PM

मुंबई: आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात बंपर तेजी पहायला मिळाली. या नव्या कर प्रणालीनुसार वैयक्तिक आयकरात पाच स्लॅब तयार करण्यात आले आहेत. ही आयकर सूट मर्यादा आता सात लाखांपर्यंत केली आहे. हे जाहीर होताच शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सुमारे दोन टक्के म्हणजेच 1100 अंकांच्या वाढीसह 60,636.96 अंकांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी दीड टक्क्यांनी वाढून 17,931.15 अंकांवर पोहोचला आहे.

बजेटच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात जबरदस्त झाली. सततचा तोटा सहन कराव्या लागणाऱ्या गुंतवणूकदारांना आज दिलासा मिळाला आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना काही मिनिटांत सुमारे 1.50 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एकीकडे सेंसेक्स 400 हून अधिक अंकांनी वाढून 60 हजार अंकांच्या पुढे गेला. त्याचवेळी निफ्टीने 13 अंकांच्या वाढीसह 17600 अंकांची पातळी ओलांडली.

बजेट जाहीर होण्याच्या एक दिवस आधीही शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली होती. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सेंसेक्स आणि निफ्टी हे दोन्ही एक टक्क्याहून अधिक वाढीसह बंद झाले होते.

हे सुद्धा वाचा

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेंसेक्स सकाळी 9.25 वाजता 437.32 अंकांच्या वाढीसह 59,987.22 अंकांवर पोहोचला होता. व्यापार सत्रादरम्यान सेंसेक्स 60,066.87 अंकांवर पोहोचला. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक 99.25 अंकांच्या वाढीसग 17,761.40 अंकांवर पोहोचला होता. शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारात आणखी तेजी दिसून येऊ शकते.

या शेअर्समध्ये तेजी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्के, ICICI बँकेच्या शेअर्समध्ये 2.40 टक्क्यांची वाढ झाली. हिंदाल्कोचे शेअर्स 2 टक्क्यांनी तर डिविस लॅकचे शेअर्स दीड टक्क्यांनी वाढले. JSW स्टीलचे शेअर्स 1.34 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

या शेअर्समध्ये घट

BPCL च्या शेअर्समध्ये 1.41 टक्क्यांची घट पहायला मिळाली. तर अदानी इंटरप्रायजेजच्या शेअर्समध्ये एक टक्का घट झाली. सनफार्मा शेअर्समध्ये 0.97 टक्के तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि ITC च्या शेअर्समध्ये 0.35 टक्क्यांची घट पहायला मिळाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.