Gold rate today: बजेटआधी सोन्या-चांदीमध्ये मोठी उसळी, 4000 रुपयांनी वाढले भाव; वाचा आजचे दर

नवी दिल्ली : आज निर्मला सीतारमण 2021 चा अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करणार आहेत. यामुळे बजेटआधीच सोने-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Silver rate) वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. एमसीएक्सवर (MCX) फेब्रुवारीच्या डिलीव्हरी सोन्यामध्ये 274 रुपयांच्या वाढीसह 49370 रुपयांवर दर दहा ग्रॅम मार्केट बंद झालं. पण आज सकाळी 9.05 वाजता हे मार्केट थेट 185 रुपयांच्या वाढीसह 49281 रुपयांच्या […]

Gold rate today: बजेटआधी सोन्या-चांदीमध्ये मोठी उसळी, 4000 रुपयांनी वाढले भाव; वाचा आजचे दर
Gold And Silver Price
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 10:22 AM

नवी दिल्ली : आज निर्मला सीतारमण 2021 चा अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करणार आहेत. यामुळे बजेटआधीच सोने-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Silver rate) वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. एमसीएक्सवर (MCX) फेब्रुवारीच्या डिलीव्हरी सोन्यामध्ये 274 रुपयांच्या वाढीसह 49370 रुपयांवर दर दहा ग्रॅम मार्केट बंद झालं. पण आज सकाळी 9.05 वाजता हे मार्केट थेट 185 रुपयांच्या वाढीसह 49281 रुपयांच्या पातळीवर सुरू झालं आहे. (budget gold and silver gains 4000 rupees on 1 feb before budget 2021)

यासोबतच एप्रिल डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचे दर (Gold rate 1 february) 253 रुपयांच्या वाढीसह 49590 रुपयांवर होतं. तर जून डिलीव्हरीच्या सोन्याचा भाव 39 रुपयांनी वाढून 49653 रुपयांवर होती. आज चांदीच्या किमतींविषयी (Silver rate 1 february) बोलायचं झालं तर एमसीएक्सवर चांदी मार्चमधील चांदी 1944 रुपयांनी वाढून 71650 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आज सकाळी 9.10 वाजता 4167 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 73873 रुपयांच्या पातळीवर सध्या चांदीचा व्यापार सुरू आहे. यावेळी चांदीचा भाव 4048 रुपयांच्या वाढीसह 74789 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या भावांमध्ये तेजी दिसून आली. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या माहितीनुसार, सकाळी 9.10 वाजता सोन्याचा भाव 14.85 डॉलर (+ 0.80%) वाढीसह प्रति औंस 1,865.15 डॉलरवर होता. तर यावेळी चांदीमध्ये देखील उसळी आल्याचं पाहायला मिळालं. मार्च डिलिव्हरीची चांदी 1.93 डॉलर तेजीसह प्रति औंस 28.84 डॉलरवर व्यापार करत होती.

बजेटनंतर सोन्याचे दर पडणार?

देशाचं बजेट आता काही तासांवर येऊन ठेपलंय आणि सोन्याच्या भावाचं (Gold rates) काय होणार असा सर्वात मोठा प्रश्न ग्राहक आणि सोन्याचे व्यापारी असा दोघांनाही पडलाय. तर त्याचं उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मतानुसार बजेटनंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होऊ शकते. सध्या सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त असल्यामुळे आणि त्यात पुन्हा जीएसटी लागत असल्यानं सोन्याचे वाढलेत.

सध्या इम्पोर्ट ड्युटी 12.5 टक्के एवढी तर जीएसटी 3 टक्के एवढी आहे. खूप काळापासून सोन्याची इम्पोर्ट ड्युटी कमी करावी तसच जीएसटीतही सुधार करावी अशी मागणी व्यापारी करतायत. ती कदाचित ह्या बजेटमध्ये पूर्ण केली जाईल असं जाणकारांना वाटतं. इम्पोर्ट ड्युटी कमी केली तर सोन्याच्या दरात मोठी घसरण निश्चित मानली जातेय.

बजेटच्या दिवशी सोने स्वस्तात खरेदी करण्याची संधी

1 फेब्रुवारीला सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या (Sovereign Gold Bond Scheme) 11 व्या सिरीजचे सबस्क्रिप्शन ओपन होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या स्कीमची इश्यू प्राईस 4,912 रुपए प्रति ग्रॅम इतकी निश्चित केली आहे. तुम्ही या स्कीममध्ये 1 ते 5 फेब्रुवारी या काळात गुंतवणूक करु शकता. (budget gold and silver gains 4000 rupees on 1 feb before budget 2021)

संबंधित बातम्या – 

Budget Marathi 2021 LIVE : निर्मला सीतारमण संसद भवनात दाखल, थोड्याच वेळात बजेट

Stock Market Update : अर्थसंकल्पाची घोषणा होताच शेअर बाजार उसळणार, काय असेल चाल?

Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा

बजेटच्या दिवशी सोने स्वस्तात खरेदी करण्याची संधी; 10 ग्रॅम सोने खरेदी केल्यास इतक्या रुपयांची सूट

(budget gold and silver gains 4000 rupees on 1 feb before budget 2021)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.