budget 2022 | 28 फेब्रुवारीला सादर केला जाणारा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होऊ लागला! यामागचं लॉजिक काय?
सर्वात मोठ्या लोकशाहीचा गाडा हाकण्यासाठी पैशांची आवक-जावक मांडणे आवश्यक आहे. 7 एप्रिल 1860 रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प ब्रिटिशांनी मांडला होता. आता या गोष्टीला पार 180 वर्षे पूर्ण झाली आहेत. कोट्यवधींची आकडेवारी, हजारो योजनांचे नियोजन, राष्ट्रउभारणीसाठीच्या या हवनकुंडात अनेक समिधा पडतात. त्याचाच हा मागोवा घेण्याचा प्रयत्न
मुंबई : अर्थसंकल्प. देशाचे उत्पन्न आणि खर्च यांचा लेखाजोखा सामान्य भाषेत मांडण्याची वार्षिकी कसरत. देशाच्या विकास आराखड्याचा प्रस्तावित मसुदा .आगामी वर्षासाठी देशाचा आर्थिक लेखाजोखा. अनेक विशेषणांनी ही आवज-जावक नटलेली आहे. हा जणू एक लग्नसोहळाच आहे. खर्चाचे आणि कमाईचे लग्नच जणू. दोन विरोधी धारांना एकत्रित जुळवून देशाचा विकास साध्य करण्याचे एक साधन म्हणजे अर्थसंकल्प (Budget). भारतातील त्याचा इतिहास पाहिला तर तो 180 वर्षांचा आहे. 7 एप्रिल 1860 रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी सादर केला आणि देशाचे भाग्य बघा. या देशातील प्रत्येक घराची किल्ली स्त्रीयांच्या हाती आहे. त्याच देशाचा अर्थसंकल्प एक महिला अर्थमंत्री सलगपणे मांडत आहे. स्त्री ही जात्याची हिशोबी असते. तिची काटकसर आणि हिशेब घराला पुढे नेतो. तसेच राष्ट्राला पुढे नेण्याची धुरा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या खांद्यावर आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. पण तुम्हाला माहीत आहे का की, वर्षांआधीपर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी नव्हे, तर शेवटच्या दिवशी सादर केला जात असे. म्हणजेच 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारीला. ही परंपरा सर बेसिल ब्लॅकेट यांनी 1924 साली सुरू केली होती, जी 1999 सालापर्यंत सुरु होती
28-29 फेब्रुवारीलाच संध्याकाळी 5 वाजताच का?
1924 ते 1999 या काळात फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. रात्रभर जागून आर्थिक हिशेब तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना विश्रांती देणे हे यामागील कारण होते. 28 किंवा 29 फेब्रुवारी हा महिन्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी विश्रांती घेत असत.
ब्रिटिश पार्लमेंट दुपारी बजेट मंजूर करून घेत असे
केंद्रीय अर्थसंकल्प हा फेब्रुवारीचा शेवटचा कामकाजाचा दिवस म्हणून संध्याकाळी पाच वाजता घोषित करण्याची ही प्रथा वसाहतवादी काळापासून भारताला वारशाने मिळाली होती. खरे तर ब्रिटिश पार्लमेंट दुपारी बजेट मंजूर करून घेत असे, पण भारतात मात्र संध्याकाळी बजेट मंजूर होत असे. त्यामागे टायमिंगचं कनेक्शन आहे
ब्रिटन कनेक्शन
ब्रिटन कनेक्शन : खरं तर भारतात संध्याकाळचे 5 वाजले की तेव्हा ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये सकाळचे 11ः30 वाजतात. हा त्यामागचा खरा धागा होता. लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बसून खासदार भारताच्या बजेटची भाषणे ऐकत असत.
पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची ही परंपरा कायम राहिली
लंडन शेअर बाजारही (LSE) त्याच वेळी सुरू झाला. अशा परिस्थितीत भारतात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे हित या अर्थसंकल्पातून निश्चित करण्यात येत असे. ब्रिटनमध्येही कंपन्यांचे लक्ष ब्रिटिशकालीन भारताच्या अर्थसंकल्पावर होते. मात्र, स्वातंत्र्यानंतरही फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची ही परंपरा कायम राहिली.
एनडीए सरकारमध्येही ही परंपरा खंडित
NDAने परंपरा बदलली, यशवंत सिन्हांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. ब्रिटिशकालीन भारताची ही परंपरा देशात राज्यघटना लागू झाल्यानंतर 50 वर्षांनी बदलण्यात आली. तत्कालीन एनडीए सरकारमध्येही ही परंपरा खंडित झाली होती. 2000 साली तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ते पूर्णपणे भारतीय कालानुरूप आणि भारतीय परंपरेला अनुसरून होता.
इतर बातम्या Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!
Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत