ही नेमकी भानगड काय? 7 लाखांपर्यंत टॅक्स फ्री, पण 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर भरावा लागणार

यंदाच्या अर्थसंकल्पातून (Union Budget 2023-24) मोदी सरकारनं (Modi Government) मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठं गिफ्ट दिलंय. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नसेल. मात्र 3 लाखांपासून टॅक्स स्लॅबचीही घोषणा झालीय.

ही नेमकी भानगड काय? 7 लाखांपर्यंत टॅक्स फ्री, पण 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर भरावा लागणार
union budget 2023Image Credit source: sansad tv
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 11:45 PM

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पातून (Union Budget 2023-24) मोदी सरकारनं (Modi Government) मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठं गिफ्ट दिलंय. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नसेल. मात्र 7 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री असलं तरी, 3 लाखांपासून टॅक्स स्लॅबचीही घोषणा झालीय. त्यामुळं काहीसा संभ्रम निर्माण झालाय. इन्कम टॅक्स संदर्भातला संभ्रम दूर करणारण्यासाठी आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्तची घोषणा केली आणि सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला. कारण इन्कम टॅक्समध्ये मोदी सरकारनं, मोठी घोषणा केली. 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त अर्थात टॅक्स फ्री असेल. म्हणजे 7 लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कर द्यावा लागणार नाही. पण असं असलं तरी, जे टॅक्स स्लॅब घोषित झालेत त्यात 3 लाखांपासूनच्या उत्पन्नावर टॅक्स लावण्यात आलाय. आता हा काय प्रकार आहे? असा प्रश्न अनेकांना पडतोय. पण त्याआधी टॅक्स स्लॅबविषयी माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.

0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नसेल. आधी ही मर्यादा अडीच लाखांची होती. ही मर्यादा 50 हजारांनी वाढवलीय. 3-6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 % कर द्यावा लागेल.

6 -9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 % कर असेल 9-12 लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर 15 % कर 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 % कर आणि 15 लाखांच्या पुढे उत्पन्न असेल तर 30 % कर आहे

एकीकडे 7 लाखांचं उत्पन्नही कर मुक्त असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. दुसरीकडे 3 लाखांपासून करही असेल. आता मनातला संभ्रमही दूर करुयात.

नेमका प्रकार काय?

जर तुमचं उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचं उत्पन्न करमुक्त असेल. पण जर उत्पन्न 7 लाखांच्या वर असेल तर मग 7 पर्यंतच्या करमुक्त स्कीमचा फायदा घेता येणार नाही. त्यामुळं 7 लाखांच्या वर उत्पन्न असल्यानं संबंधित व्यक्तीला 3 लाखांपासून कर द्यावा लागेल. अर्थात एखाद्याचं उत्पन्न 7 लाख 50 हजार असेल. तर साडे 7 लाखांमधून 3 लाखांपर्यंतच करमुक्त उत्पन्न वजा होईल आणि उर्वरित साडे 4 लाखांवर कर द्यावा लागेल.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्याआधी मध्यमवर्गींयांना खूश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केलाय. आणि 7 लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्यानं नोकरदारांनी समाधान व्यक्त केलंय. आता किती लाखांवर किती रुपये कर द्यावा लागेल, त्याची देखील माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर काहीही टॅक्स नसेल 8 लाखांच्या उत्पन्नावर 35 हजार रुपये टॅक्स द्यावा लागेल 9 लाखांच्या उत्पन्नावर 45 हजार टॅक्स द्यावा लागेल 10 लाखांच्या उत्पन्नावर 60 हजार टॅक्स भरावा लागेल 12 लाखांच्या उत्पन्नावर 90 हजार तर 15 लाखांच्या उत्पन्नावर दीड लाख टॅक्स असेल

बजेट म्हटलं की कर रचनेवरच सर्वांच्या नजरा असतात. कारण टॅक्स स्लॅबचा थेट परिणाम खिशावरच होतो. पण यावेळी मोदींनी सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदारांना खूष केलंय.

अर्थसंकल्पानंतर, तुमच्या खिशावरही त्याचा परिणाम होणार आहे.नेमकं काय स्वस्त होणार आहे आणि काय महाग तेही पाहुयात.

काय स्वस्त ?

मोबाईल एलईडी टीव्ही कॅमेरा लेन्स इलेक्ट्रिक कार सायकल खेळणी

काय महाग ?

सोने चांदी दारु हिरे सिगारेट छत्री

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.