बजेटमधील मोठ्या घोषणा काय?; A टू Z माहिती जाणून घ्या…

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार देण्यात येणाऱ्या पाच किलो मोफत धान्य देण्याची डेडलाईन वाढवण्यात आली आहे. पुढची पाच वर्ष गरीबांना मोफत अन्न दिलं जाणार आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड येथे विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

बजेटमधील मोठ्या घोषणा काय?; A टू Z माहिती जाणून घ्या...
nirmala sitharamanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 1:07 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडला आहे. निर्मला सीतारामन यांचा हा सातवा आणि मोदी सरकारचा हा 13 वा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महिला, आदिवासी, गरीब, शेतकरी आणि तरुणांवर या अर्थसंकल्पात अधिक फोकस करण्यात आला आहे. आजच्या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत. आयकरात बदल करण्यात आला आहे. तसेच बिहार आणि आंध्रप्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या घोषणा

पाच राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट योजना आणणार

6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्ट्रीवर नोंदवली जाणार

पूर्वेकडी राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 हून अधिक शाखा उघडणार

ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद

आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य

पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरणार

भाजीपाला उत्पादन आणि वितरणासाठी आणखी एफपीओ स्थापन करण्यात येणार

पंतप्रधान इंटर्नशीप योजनेनुसार 5 हजार रुपये मासिक भत्ता मिळणार आहे.

आसाममधील पूर नियंत्रणासाठी केंद्र आर्थिक मदत करणार आहे

बिहारच्या कोसीसाठीही योजना राबवणार आहे.

सरकार ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक धोरणात्मक निर्णय घेणार आहे

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 1.8 कोटी लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

पीएम आवास योजना- शहरी 2.0साठी एक कोटी कुटुंबाला घरे देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सरकार शहरी घरांसाठी स्वस्तात कर्ज देण्यासाठी व्याज सबसिडी योजना आणण्यात येणार आहे.

राज्यांसाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे

टॅक्स प्रकरणे सहा महिन्यात सोडवणार

इन्कम टॅक्स अॅक्ट 1961ची सहा महिन्यात समीक्षा केली जाणार

स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द

परदेशी कंपन्यांवरील कार्पोरेट टॅक्स दर 40 टक्क्यांवरून 35 टक्के करणार

बिहारमध्ये हायवेसाठी 26 हजार कोटींची तरतूद

न्यू रिजीममध्ये असा असेल टॅक्स स्लॅब

0-3 लाखाच्या उत्पन्नावर कोणताच कर नसेल

3 ते 7 लाखाच्या उत्पन्नावर 5 टक्के कर

7 ते10 लाखाच्या उत्पन्नावर 10 टक्के कर

10 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर 15 टक्के कर

12 ते 15 लाखाच्या उत्पन्नार 20 टक्के कर

15 लाखाहून अधिकच्या उत्पन्नावर 30 टक्के कर

जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये काहीच बदल नाही

काय स्वस्त होणार

कॅन्सरची तीन औषधे

मासे

मोबाईल फोन

चार्जर

चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू

सोने, चांदी

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.