AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Economic Survey : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मोठा झटका, तीन वर्षांतील नीच्चांकी वाढ अपेक्षित

Economic Survey : बजेटपूर्वी आर्थिक आघाडीवर मोठा झटका बसला आहे.

Economic Survey : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मोठा झटका, तीन वर्षांतील नीच्चांकी वाढ अपेक्षित
मोठा झटका
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 4:11 PM

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री 11 वाजता देशाचे आर्थिक सर्व्हेक्षण (Economic Survey) सादर करतील. पण सर्व्हे सादर होण्यापूर्वची केंद्र सरकारला मोठा आर्थिक झटका बसला आहे. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सने (Reuters) एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार 2023-24 मध्ये विकासाचा दर 3 वर्षात सर्वात कमी असेल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करण्यापूर्वी केंद्र सरकार आज इकोनॉमिक सर्व्हे सादर करणार आहे. त्यामध्ये वाढीचा दर 6 ते 6.8 टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, एका सरकारी सर्वेक्षणात 2023-24 साठी बेसलाईन ग्रोथ 6.5 टक्के असू शकते. ही वाढ अत्यंत कमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey 23) संसदेसमोर मांडणार आहेत.

आर्थिक सर्वेक्षण सादर केल्यानंतर उद्या, 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. आर्थिक सर्वेक्षण सादर केल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) व्ही. अनंत नागेश्वरन या आर्थिक घडामोडींची माहिती पत्र परिषदेत देतील.

हे सुद्धा वाचा

आर्थिक सर्वेक्षण हे मुख्यतः एका वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचा लेखा-जोखा असतो. यावरुन देशाच्या अर्थव्यवस्थेने एका वर्षात किती विकास गाठला आणि अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती काय आहे, याची माहिती मिळते. कुठे फायदा झाला आणि नुकसान झाले याचा ठोकताळा मांडता येतो.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. अर्थविभाग आर्थिक सर्वेक्षण तयार करतो. अर्थ खात्यातंर्गत अर्थविभाग आर्थिक सर्वेक्षण करते. मुख्य आर्थिक सल्लागारांचे या प्रक्रियेवर बारीक लक्ष असते.

आर्थिक सर्वेक्षणातून देशाची आर्थिक स्थिती सध्या कशी आहे. पुढे देशाच्या विकासाचा दर काय असू शकतो, याचा अंदाज आणि ठोकताळे आर्थिक सर्वेक्षणातून मांडण्यात येतात. आर्थिक सर्वेक्षण 1964 पासून अर्थसंकल्पासोबतच सादर करण्यात येते. पण आता आर्थिक सर्वेक्षण बजेटच्या एक दिवस अगोदर सादर करण्यात येते.

आज संसदेसमोर सादर होणारे आर्थिक सर्वेक्षण तुम्हाला लाईव्ह बघता येते. संसद टीव्हीवर याचे थेट प्रक्षेपण बघता येईल. याशिवाय PIB कडून युट्यूब चॅनलवरही त्याचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तुम्ही पीआयबीच्या https://www.youtube.com/@pibindia/videos वर जाऊन लाईव्ह बघू शकता.

इकोनॉमिक सर्वेला फेसबुकवर लाईव्ह बघता येते. त्यासाठी अर्थमंत्रालयाच्या https://www.facebook.com/finmin.goi वर जावे लागेल. याठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग बघता येईल.

ट्विटर https://twitter.com/FinMinIndia वर लाईव्ह अपडेट पाहता येईल. आर्थिक सर्वेक्षण संसदेत आणि पत्रकार परिषदेनंतर याची छापावी प्रत मिळू शकते. https://www.indiabudget.gov.in/economicsurvey या लिकंवरुन तुम्हाला सर्वेक्षणाची प्रत डाऊनलोड करता येते.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.