Budget 2022 : आर्थिक विषमता दरात झाली प्रंचड वाढ, श्रीमंत झाले अब्जाधीश,ऑक्सफॅमच्या अहवालानं खळबळ
जागतिक आर्थिक मंचाच्या ( World Economic Forum)सुरुवातीला 17 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमच्या(Oxfam report) दोन अहवालांनी जागतिक स्तरावर खळबळ माजवली. या रिपोर्ट मधून जी माहिती समोर आली ती चिंता दर्शवणारी ठरली.
नवी दिल्ली: जागतिक आर्थिक मंचाच्या ( World Economic Forum)सुरुवातीला 17 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमच्या(Oxfam report) दोन अहवालांनी जागतिक स्तरावर खळबळ माजवली. या रिपोर्ट मधून जी माहिती समोर आली ती चिंता दर्शवणारी ठरली.या रिपोर्ट मुळे भारतातील संपत्ती आणि उत्पन्नातील असमानतेवर अधिक प्रकाश टाकला गेला. ‘इनइक्वॅलिटी किल्स:इंडिया सप्लीमेंट 2022 या शीर्षकखाली जो रिपोर्ट प्रकाशित झाला त्यात कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व असमानतेचा सामना करण्यासाठी आवश्यक ती कृती करणे आवश्यक आहे. या रिपोर्ट नुसार लॉकडाऊन( lockdown )ची घोषणा झाल्यानंतर भारतातील 98 सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीश बनले. देशातल्या 40 टक्के गरीब लोकसंख्येच्या एकूण संपत्तीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. तसंच दुसरीकडे 2021 मध्ये 84 टक्के सर्वसामान्य नागरिकांचं उत्पन्न( income) घटल्याचं या अहवालात म्हटलं आहे. सर्वात 100 श्रीमंत भारतीयांची संपत्ती अंदाजे $775 अब्ज इतकी आहे. या क्लबच्या संपत्तीमध्ये सुमारे एक पंचमांश वाटा गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील एका व्यावसायिक समूहाने दिला.
बेरोजगारी दर 15 टक्क्यांवर
वर्ष 2021 मध्ये, भारताने 120 मिलियन नोकऱ्या कमी केल्या, ज्यात असंघटित क्षेत्रातील 92 मिलियन नोकऱ्यांचा समावेश आहे अशातच बेरोजगारीचा दर 15 टक्क्यांवर पोहोचलेला आहे. त्याचवेळी, 84 टक्के भारतीयांच्या कौटुंबिक उत्पन्नात घट झालेली पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षातील अंदाजानुसार आणखी एक वर्ष नकारात्मकतेत वाढ करणारे दर्शवित आहे, या वर्षी अन्न असुरक्षितता मध्ये देखील वाढ झाली आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या 2021 च्या रिपोर्ट नुसार, ‘स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन’ नुसार भारतातील 200 मिलियन लोक यांना योग्य पोषण न मिळाल्या मुळे ते कुपोषित झाले आहेत.
श्रीमंत देशातही विषमता वाढली
जिथे विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढत आहे असा एकमेव भारत एकटा देश नाही.ऑक्सफॅमच्या वर्ल्ड रिपोर्ट मध्ये काही गोष्टी प्रामुख्याने आधोरेखित झाल्या त्या म्हणजे की जगातील 10 सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती महामारीच्या काळात सुरुवातीपासून दुप्पट होऊन $1.3 अब्ज डॉलर्स दराने $1.5 ट्रिलियन झाली आहे याचाच अर्थ या अब्जाधीशाकडे जगातील 40 टक्के लोकसंख्येइतकी संपत्ती आहे. ऑक्सफॅम जागतिक अहवालात म्हटले आहे की 10 जे अब्जाधीश झाले ते कोविड-19 नंतर त्यांच्या संपत्ती मध्ये आपल्याला वाढ झालेली दिसली.जगाला लसीकरण करण्यासाठी, हवामान बदल, सार्वत्रिक आरोग्य सेवा आणि सामाजिक संरक्षण आणि अन्य काही संसाधने प्रदान करण्यासाठी खर्च होत असताना परंतु 10 अब्जाधीशांची मिळून 8 अब्ज डॉलर्सची झालेली कमाई ही या महामरीच्या नंतरच्या काळातील आहे.
मार्च 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या प्यू रिसर्चच्या रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की, भारतीय मध्यमवर्ग 2020 मध्ये 32 मिलियनने कमी झाला आहे, जो मध्यम-उत्पन्न गटाच्या जागतिक लोकसंख्यापैकी 60 टक्के आहे, ज्यांना $10.01-20 (अंदाजे रु. 725 ते 1,450 दिवसाची कमाई ) याचा अर्थ असा होतो की मध्यमवर्गीय लोकांची संख्या 99 मिलियन लोकांची इनकम ही महामारी येण्या आधीच्या परिस्थिती पेक्षा दोन तृतीयांश टक्के पर्यंत घसरली आहे. त्याच वेळी, दररोज $2 किंवा त्यापेक्षा कमी (अंदाजे रु. 145 किंवा त्याहून कमी कमावणारे) गरीब लोकांची संख्या 75 मिलियन वाढली आहे, जी आकडेवारी जागतिक गरिबीच्या वाढीच्या 60 टक्के आहे. जानेवारी 2020 च्या 4.3 टक्क्यांच्या अंदाजाप्रमाणे गरीब लोकांची एकूण संख्या 134 दशलक्ष, 59 दशलक्ष पूर्वीच्या अंदाजापेक्षा दुप्पट झाली. साथीच्या रोगाच्या काळात, सर्व पूर्वसूचना देऊनही सरकार गरिबांना मदत करण्यात अयशस्वी ठरली आहे. हे, अर्थातच, बर्याच काळापासून तयार करण्यात एक आपत्ती आहे. आर्थिक उदारीकरणाने गरिबी दूर करणे अपेक्षित होते. चांगल्या राजकीय नीतीने भारताच्या कर रचनेचा पुनर्विचार करणे सुद्धा आवश्यक आहे.
इतर बातम्या:
कृत्रिम बहुमताने मिळालेली सत्ता आघाडीच्या डोक्यात गेल्याने हम करे सो कायदा वागत होते-चंद्रकांत पाटील
हेही पाहा
inequality rising India must restructure taxes for rich to provide for bottom