राज्याच्या योजना कॉपी पेस्ट करणारा अर्थसंकल्प – सुप्रिया सुळे

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय. पण यावरुन सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांवर अन्याय केल्याची टीका त्यांनी केली आहे.

राज्याच्या योजना कॉपी पेस्ट करणारा अर्थसंकल्प - सुप्रिया सुळे
supriya sule
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 5:06 PM

अर्थममंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सलग सातव्यांदा आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्ती केली आहे. या बजेटमध्ये नवीन काहीच नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्वसामान्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेसच्याच योजना या अर्थसंकल्पात कॉपी करण्यात आल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे देशाचं बजेट आहे. भारत सरकार म्हणजे प्रत्येक राज्याचा मोठा भाऊ आहे. फक्त महाराष्ट्र नाही इतर राज्यांना पण काहीही मिळालेलं नाही. बंगाल आणि झारखंडला काय मिळालं. आपला लाडका बिहार आणि आपला लाडका आंध्रप्रदेश इतकंच या अर्थसंकल्पात होतं. महाराष्ट्र आणि इतर राज्य परके आहेत का?

त्या म्हणाल्या की, ‘काहीही टॅक्स रिफॉर्म नाही. फक्त फॉरेन कंपनीचा टँक्स ३० वरुन २५ वर आला आहे. नवीन काहीही नाही या बजेटमध्ये. अर्थमंत्री म्हणाल्या की, आम्ही शेतकऱ्यांचं ५० टक्के उत्पन्न वाढवणार. त्यांनी १० वर्षात दुप्पट करणार असल्याचं म्हटलं होतं. दुसरं मला खटकलं ते लँड रिफॉर्म. जमीन हा राज्याचा विषय आहे. आम्ही सगळे लँड रिफॉर्म हे डिजीटलायजेशन करु असं त्यांनी म्हटलं. पण हा राज्याचा विषय आहे यात केंद्र का हस्तक्षेप करतंय. राज्याच्या योजना या कॉपी करुन घेतल्या आहेत. काँग्रेसचीच योजना कॉपी पेस्ट केली आहे.’

बजेट मध्ये 2-4 चांगल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या गोष्टी काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील आहेत. अनेक गोष्टी त्यातील बजेटमध्ये आहेत. देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की सगळ्या राज्याला सारखा निधी मिळावा. बिहार, आंध्रला निधी दिला त्याच दुःख नाही पण महाराष्ट्रावर अन्याय का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.