BUDGET 2022: शेअर बाजाराला ‘ग्रोथ रेट’चा बूस्टर; बजेटच्या पहिल्याच दिवशी तेजी, सेन्सेंक्स 813 अंकांनी उसळला

सेंन्सेक्स 813 अंकांच्या वाढीसह 57,845 अंकांवर बंद झाला. निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 7,339 अंकांवर बंद झाला.

BUDGET 2022:  शेअर बाजाराला ‘ग्रोथ रेट’चा बूस्टर;  बजेटच्या पहिल्याच दिवशी तेजी, सेन्सेंक्स 813 अंकांनी उसळला
sensex
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 8:14 PM

नवी दिल्लीः संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प पाहणी अहवालाचे (ECONOMIC SURVEY OF INDIA) सकारात्मक पडसाद शेअर बाजारात दिसून आले. सेंन्सेक्स 813 अंकांच्या वाढीसह 57,845 अंकांवर बंद झाला. निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 7,339 अंकांवर बंद झाला. टेकम, विप्रो, बजाज फिनसर्व्ह टॉप गेनर (TOP GAINERS) ठरले. इंड्सइंड बँक, कोटक बँक, हिंदूनी लिव्हर तोट्यात राहिले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 44 शेअर्स तेजीसह बंद झाले. टेक महिंद्राची कामगिरी (TECH MAHINDRA) वरचढ राहिली. टेक महिंद्राचे स्टॉक 5.1 टक्क्यांच्या वाढीसह ₹1482.95 वर बंद झाले. टाटा मोटर्स शेअरमध्ये 4% टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. विप्रो, BPCL आणि बजाज फिनसर्व्ह शेअर्समध्ये 3% टक्क्याहून अधिक तेजी दिसून आली.

आजचे तेजीचे शेअर्स:

• टेक महिंद्रा (4.85) • टाटा मोटर्स (4.11) • बीपीसीएल (3.80) • विप्रो (3.70) • बजाज फिनसर्व्ह (3.23)

आजचे घसरणीचे शेअर्स:

• इंड्सइंड (-3.48) • कोटक महिंद्रा (-2.16) • यूपीएल (-1.74) • कोल इंडिया(-1.14) • एचयूएल(-0.43)

विकास दरानं मार्केटला एनर्जी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaran) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण 2022 (Economic Survey 2022) सादर केले. आर्थिक पाहणी अहवालात चालू आर्थिक वर्षाचा विकास दर (GDP) हा 9.2 टक्के वर्तवण्यात आला आहे. कोरोना महामारीतून अर्थव्यवस्था सावरत असून, पुढील आर्थिक वर्षात विकासाला वेग येईल, असा विश्वास यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातील शेअर बाजारात असलेली मरगळ झटकली गेली.

मार्केटच्या नजरा अर्थसंकल्पाकडे:

केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात (Share Market Updates) तेजी-घसरणीच सत्र सुरू होतं. मात्र, अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजीचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या आशा उंचावल्या आहेत. गेल्या वर्षी अर्थसंकल्प 2021 दिवशी सेंन्सेक्स मध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. उद्या नेमकी अर्थसंकल्प सादरीकरणावेळी मार्केटचा मूड कसा असेल याकडे अर्थजगताच्या नजरा लागल्या आहेत. उद्योगांना अनुकूल धोरण, कोविड पॅकेज तसेच पायाभूत सुविधांसाठी मोठ्या निधीची तरतुदीची मार्केटला आशा आहे.

संबंधित बातम्या

Budget 2022: स्टॉक मार्केट आणि म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांनी, अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी, गुंतवणूकदार यांनी लक्षात ठेवाव्यात काही गोष्टी!!

BUDGET EXPECTATION FROM SALARIED CLASS : सर्वसामान्य नौकरदार, मध्यमवर्गीयांना यंदाच्या बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.