Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या वेळेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? यापूर्वी अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ कोणती होती?
अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही परंपरा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दरम्यान अनेकदा चर्चेत येत असतात. ब्रिटिश काळातील परंपरा आणि त्यात झालेले बदल आजही चर्चिले जात आहे.
नवी दिल्ली : 31 जानेवारीला भारताच्या राष्ट्रपती यांचं संसदेत अभिभाषण झाल्यानंतर 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. त्याची वेळ 11 वाजेची निश्चित केलेली असते. पूर्वी अर्थसंकल्प ( Budget 2023 ) राष्ट्रपती भवनात छापला जात होता. मात्र, तो लिक झाल्यानंतर तिथं छापणं बंद झालं आणि नंतर अर्थमंत्रालयातच छपाईचं काम सुरू झाले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून ही छपाई देखील बंद करण्यात आली असून टॅबच्या माध्यमातून निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. संगणक प्रणालीच्या माध्यमातून अर्थसंकल्प अर्थमंत्रालयातून संसदेत आणला जातो. त्यामधून अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitaraman ) यांनी अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केल्याने ही नवी परंपरा सुरू झाली आहे. स्वातंत्र्यानंतरही अर्थसंकल्प बऱ्याच काळ सायंकाळी पाच वाजता सादर करण्यास सुरुवात केली जायची. मात्र, 2001 मध्ये वाजपेयी सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलली. आणि ती 11 वाजता करण्यात आली होती. तेव्हा 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याचा मान यशवंत सिन्हा यांना मिळाला होता.
अर्थसंकल्प सादर करण्याचे अनेक किस्से राजकीय व्यक्तींनी जाहीर व्यासपीठावर सांगितले आहे, त्यानुसार ब्रिटिश काळापासून सायंकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जात होता.
अर्थसंकल्प पाचनंतर सादर केल्यास त्याचा परिणाम शेअर बाजारावर होत नाही, त्यामुळे सायंकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जात असायचा असेही सांगितलं जायचं.
तर दुसरिकडे इंग्रजांनी भारतात राज्य करण्यास सुरुवात केली तेव्हापासून तेथील संसदेत भारताचं अर्थसंकल्प ऐकण्यासाठी तेथील साडे अकराच्या वेळेनुसार भारतात पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जात होता.
भारताचा अर्थसंकल्प ब्रिटनमध्ये ऐकण्यासाठी संसदेत सर्व खासदार उपस्थित राहायचे, संसदेत बसून तिथेही भारताचा अर्थसंकल्प ऐकजा जात होता. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आल्यावर ही परंपरा सुरू केली होती.
स्वातंत्र्यानंतरही भारतात पन्नासहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी घालून दिलेला पायंडा सुरूच होता, मात्र वाजपेयी सरकारने त्यात बदल करून सकाळी 11 वाजेची वेळ अर्थसंकल्प सादर करण्यासाठीची लागू केली आहे.
तेव्हापासून कुठलेही सरकार आले तरी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो, आणि त्याची वेळ देखील 11 वाजेचीच असते, त्यामुळे जुन्या आणि नव्या परंपरेची चर्चा अर्थसंकल्पाच्या वेळी वारंवार होत असते.
भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी याबाबत एकदा एका मुलाखतीत ही माहिती दिली होती, त्यावरून त्यांनी अर्थसंकल्पाच्या परंपरा सांगितल्या होत्या.
बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा