Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार? GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार?  GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी
दुचाकी (प्रातिनिधिक छायाचित्र)
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 1:45 PM

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA -Federation of Automobile Dealers Associations of India) या भारतीय ऑटोमोबाईल रिटेलर्सच्या संघटनेने अर्थमंत्र्यांपुढे काही मागण्या मांडल्या आहेत. देशात दुचाकींची विक्री वाढावी यासाठी त्यावरील GST चे दर कमी करण्याची मागणी केली आहे.

FADA च्या प्रतिनिधींनी टीव्ही 9 मराठीला माहिती देताना सांगितले की, उद्योग आणि ऑटो रिटेल ट्रेडला पुन्हा वाढीच्या मार्गावर आणण्यासाठी आमच्या संघटनेने (FADA) अर्थ मंत्रालयाला टू व्हीलरवरील GST चे दर 18% पर्यंत नियमन आणि कमी करण्याची मागणी केली आहे. FADA ने दुचाकीवरील जीएसटी दर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्याची मागणी केली आहे, जेणेकरून दुचाकींची मागणी वाढू शकेल. FADA ने सांगितले की, दुचाकी हे लक्झरी उत्पादन नाही. त्यामुळे जीएसटीचे दर कमी करण्याची गरज आहे. FADA चा दावा आहे की, ते देशातील 15,000 पेक्षा जास्त ऑटोमोबाईल डीलर्सचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांच्याकडे सध्या 26,500 डीलरशिप आहेत.

दुचाकी हे लक्झरी उत्पादन नाही

संघटनेचे म्हणणे आहे की, दुचाकींचा चा वापर लक्झरी म्हणून नव्हे तर खालच्या वर्गातील आणि ग्रामीण भागातील नागरिक त्यांच्या दैनंदिन कामाच्या गरजांसाठी करतात. त्यामुळे luxury / sin उत्पादनांसाठी 28% GST + 2% उपकर हे टू-व्हीलर श्रेणीसाठी योग्य नाहीत.

वाहनांच्या दरवाढीला ब्रेक लावण्याची गरज

धातूंच्या किंमती आणि इतर विविध कारणांमुळे दर 3-4 महिन्यांच्या अंतराने वाहनांच्या किमती वाढत आहेत, तेव्हा GST दरातील कपात किमतीच्या वाढीचा प्रतिकार करेल आणि वाहनांची मागणी वाढण्यास मदत करेल, असे Fada ला वाटते. वाहनांच्या दरवाढीला ब्रेक लावण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

Depreciation Scheme पुन्हा सुरू करण्याची विनंती

FADA ने Depreciation Scheme पुन्हा सुरू करण्याची विनंती केली जी केवळ 31 मार्च 20 पर्यंत वैध होती. आर्थिक वर्ष 2022-23 साठी वाढवावी. विकासाला चालना देण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून 31 मार्च 2020 पूर्वी खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी depreciation rate वाढवल्याबद्दल डीलर संस्था सरकारचे आभार मानते.

अर्थव्यवस्था सुधारण्यात मदत

असोसिएशनचा असा विश्वास आहे की, मागणीतील वाढ आणि त्यामुळे अनेक अवलंबित क्षेत्रांवर होणारे परिणाम यामुळे कर संकलनात वाढ होईल आणि मध्य ते दीर्घ कालावधीत एकूणच ग्राहकांच्या वाहनांबाबतच्या विचारांत सकारात्मकता येण्याबरोबरच महसूल सकारात्मक होईल आणि त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…

Maruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये!

Toyota : टोयोटाने सादर केली दमदार नवीन SUV कार, फिचर्स पाहून थक्क व्हाल!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.