Union Budget 2023 : कसा झाला पॅनकार्डचा पुनर्जन्म?, ती 40 वर्ष…. कहाणी ऐकून तुम्हीही…
Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा केली. पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून संपूर्ण देशात मान्यता देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात ( Budget 2023)पॅनकार्ड संदर्भात महत्वाची घोषणा केली. पॅनकार्डला (PAN Card) ओळखपत्र म्हणून संपूर्ण देशात मान्यता देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे पॅनकार्डला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे. यापूर्वी पॅनकार्डाची ओळख आणि वापर (PAN Card use)मर्यादित होता, पण आता त्याचा वापर ओळखपत्र म्हणूनही करता येणार आहे. एकंदरच पॅनकार्डचा पुनर्जन्मच झाला म्हणायचा.. त्याची ही गोष्ट त्याच्याच तोंडून ऐका….
घरातल्या एखाद्या कोपऱ्यात मला जागा देणाऱ्यांनी आता इकडे लक्ष द्या…. असं म्हणतात की प्रत्येकाचे (चांगले) दिवस येतात, तसा आजचा दिवस माझा आहे. 1972 मध्ये माझा जन्म झाला खरा, पण आता या टप्प्यावर मला ‘अच्छे दिन’ आले आहेत. ही आहे माझी कहाणी..!
तसं तर माझा जन्म 1972 मध्ये झाला, पण मी चार वर्षांचा झाल्यावर माझी गरज भासू लागली. पण ज्या ड्रॉवरमध्ये पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, बँकेचे पासबुक अशी महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली असतात, तिथे मला कधीच जागा मिळाली नाही. मला नेहमी जुन्या पुस्तकांमध्ये ठेवले जायचे, माझा रंग उडून गेला तरी कोणालाही पर्वा नव्हती. माझे रूप पालटले पण कोणाच्या लक्षात आले नाही. पण हे असं का झालं तुम्हाला माहीत आहे का?
कारण वर्षातून केवळ एकदाच 31 मार्चला माझा वापर केला जायचा. तेव्हाच लोकं मला शोधायचे. बऱ्याच जणांना तर तेव्हाही मी लक्षात नसायचो. एकदा का माझा 10 आकडी नंबर लक्षात ठेवला की काम व्हायचं… नंतर माझी गरज नसायची. आधारनंतर (आधार आल्यावर) तर मी एकदम निराधारच झालो. पण एक दिवस माझी किंमत वाढेल, अशी मला आशा होतीच, अन अखेर आज तो दिवस आला आहे. आता मीसुद्धा कोणाची तरी ओळख बनेन.. हो , हे खरं आहे, मी आता सामान्य माणसाची ओळख बनेन.. ही होती पॅन कार्डची (PAN Card)कहाणी
आज सकाळ पासून मी बेचैन, अस्वस्थ होतो… ज्या ड्रॉवरमध्ये मला ठेवले होते, तो कोपरा खराब झाला होता. माझी अवस्था तर त्याहून वाईट झाली होती. कारण तो ड्रॉवर तर दोन वर्षांपूर्वीच नवीन आणला होता, पण मीला तर गेली 10 वर्षे इकडे तिकडे फेकले जात होते. आज काहीतरी चांगली बातमी येईल असे मला वाटत होते, ती अखेर आज आली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून संपूर्ण देशात मान्यता देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
यापूर्वी पॅनकार्डचा कुठेही वापर होत नव्हता असे नव्हे, पण 135 कोटी लोकसंख्येपैकी अवघे एक ते दोन टक्के लोकंच ते वापरायचे.
जाणून घ्या पॅन कार्डचा कुठे होत होता वापर
– प्रत्यक्ष कर (Direct Tax) भरताना पॅन क्रमांक दाखवावा लागतो. (बहुतांश लोकं इथेच पॅन कार्ड वापरतात.)
– आयकर भरताना, करदात्यांना त्यांचा पॅन समाविष्ट करावा लागतो.
– व्यवसायाची नोंदणी करतानाही पॅनकार्डची माहिती द्यावी लागते.
– अनेक आर्थिक कामांसाठी पॅन कार्डची माहिती आवश्यक असते.
कोणते ही व्यवहार करताना लागते पॅनकार्डची गरज :
– 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या मालमत्तेची (अचल) खरेदी किंवा विक्री करताना पॅन कार्ड लागते.
– दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहन खरेदी किंवा विक्री करताना पॅनकार्ड वापरले जाते.
– हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 25,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करायचे असेल तर त्यासाठीही पॅन कार्ड दाखवावे लागते.
– बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त ठेवींसाठी पेमेंट करताना ग्राहकाचे पॅनकार्ड मागतात.
– कमीत कमी 50,000 रुपयांचे रोखे खरेदी करताना.
– कमीत कमी 50,000 रुपयांचे शेअर्स खरेदी करताना.
– 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची विमा पॉलिसीची खरेदी करताना, तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतानाही पॅन कार्डचा उपयोग होतो.
– दागिने आणि सराफा खरेदीसाठी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम द्यायची असल्यास.
– भारताबाहेर निधी ट्रान्सफर (हस्तांतरित) करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असते.
– एनआरआय खात्यातून एनआरओ खात्यात निधी ट्रान्सफर करताना
बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा