Rail Budget 2021 | अर्थसंकल्पात रेल्वे सुसाट, तब्बल 1.10 हजार कोटींची तरतूद, बुलेट प्रकल्प स्पीडने धावणार?

रेल्वेच्या विकासासाठी राष्ट्रीय रेल योजना 2030 तयार आली आहे. यासाठी सरकारनं तब्बल 1.10 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे

Rail Budget 2021 | अर्थसंकल्पात रेल्वे सुसाट, तब्बल 1.10 हजार कोटींची तरतूद, बुलेट प्रकल्प स्पीडने धावणार?
Railway
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 6:43 PM

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Finance Minister Nirmala Sitaraman ) यांनी आज 2020-21 चा अर्थसंकल्प ( Budget 2021 ) सादर केला. यामध्ये रेल्वेसाठी (Rail Budget 2021) मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या विकासासाठी राष्ट्रीय रेल योजना 2030 तयार करण्यात आल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. या योजनेसाठी सरकारनं तब्बल 1.10 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. रेल्वेसह इतर दळण-वळणांच्या साधनांच्या विकासासाठी निर्मला सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ( What about the railway sector in the budget 2021 presented by Finance Minister Nirmala Sitaraman? )

मेट्रोचं जाळं तयार करणार

भारतीय रेल्वेच्या व्यतिरिक्त सरकारकडून मेट्रो, सिटी बस सेवा यांच्या विकासावर अधिक भर दिलेला दिसतो आहे. यासाठी तब्बल 1 हजार कोटींची निधी लावला जाणार आहे. विशेष म्हणजेच महाराष्ट्रातील मुंबईव्यतिरिक्त नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रोजेक्टचा यामध्ये समावेश असणार आहे. कोच्ची, बंगळुरु, चेन्नईतही मेट्रो प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पही जोरात

निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही उल्लेख केला. हा प्रकल्पाचं काम जोरात सुरु असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गुजरातमध्ये जरी या प्रकल्पाचं काम सुरु असलं, तरी महाराष्ट्रात या प्रकल्पाला मोठा विरोध आहे. हेच पाहता, अजूनपर्यंत महाराष्ट्रात या बुलेट ट्रेन प्रकल्पानं वेग पकडलेला दिसत नाही. मात्र, ही योजना लवकरच वेग पकडणार असल्याचे संकेत सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिले.

( What about the railway sector in the budget presented by Finance Minister Nirmala Sitaraman? )

रेल्वेचं 100 टक्के विद्युतीकरण

ब्रॉडगेज नेटवर्कच्या विद्युतीकरणाचं काम सध्या जोरात सुरु आहे. 6 हजार किलोमीटरपर्यंत रेल्वेचं विद्युतीकरण केलं जाणार आहे. 2023 पर्यंत हे 100 टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास सीतारमण यांनी व्यक्त केला. याशिवाय ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर उभारण्याचं काम सुरु आहे. याद्वारे रेल्वेला अतिरिक्त उत्पन्न मिळेल अशी आशाही सीतारमण यांनी व्यक्त केली.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाय

प्रवाशांच्या सुरक्षेवरही जास्त भर दिला जाणार असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. यासाठी नवे कोच तयार करण्यात आले आहेत. डोंगराळ भागात किंवा पर्यटन स्थळी अशा स्वरुपाच्या ट्रेन चालवल्या जातील. यातील कोच अधिक सुरक्षित आहेत. याशिवाय ज्या रेल्वेमार्गांवर जास्त वर्दळ आहे. जिथं मानवी चुकांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे, तिथं ऑटोमॅटिक पद्धतीची सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचंही सीतारमण यांनी सांगितलं.

खासगी ट्रेन सुरु करणार

आतापर्यंत सरकारच्याच हातात असलेली रेल्वे आता खासगीकरणाच्या रुळावर येताना दिसत आहे. कारण, सरकारकडून तब्बल 150 खासगी रेल्वेगाड्या सुरु करण्याचा विचार सुरु आहे. याशिवाय, नॅशनल रेल्वे प्लाननुसार दिल्ली ते वाराणसी व्हाया अयोध्या, पटना ते गुवाहाटी, वाराणसी ते पटना, हैदराबाद ते बंगळुरु, दिल्ली ते अहमदाबाद व्हाया उदयपूर, दिल्ली ते चंडीगड, मुंबई ते हैदराबाद आणि अमृतसर ते जम्मू या मार्गांवर हायस्पीड रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहेत.

( What about the railway sector in the budget 2021 presented by Finance Minister Nirmala Sitharaman? )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.