EP 10 : Bus, Evadach Swapna Aahe | नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा काय?

नाशिकच्या विपुल याने पुण्यातील (Pune) एका प्रख्यात संस्थेतून 2020 मध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगचं(Mechnicial Engineering) शिक्षण पूर्ण केलंय. विपुल हुशार आणि मेहनती होता त्यामुळे त्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये चांगले मार्कही मिळाले. शेवटच्या सेमिस्टरनंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी लागण्याची मोठी संधी होती.

EP 10 : Bus, Evadach Swapna Aahe | नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा काय?
budget expectations
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 1:11 PM

नाशिकच्या विपुल याने पुण्यातील (Pune) एका प्रख्यात संस्थेतून 2020 मध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगचं(Mechnicial Engineering) शिक्षण पूर्ण केलंय. विपुल हुशार आणि मेहनती होता त्यामुळे त्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये चांगले मार्कही मिळाले. शेवटच्या सेमिस्टरनंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी लागण्याची मोठी संधी होती. चार वर्षाच्या शिक्षणासाठी विपुलला जवळपास 12 लाख रुपयांचा खर्च आला. चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण होत असल्यानं मोठ्या पगाराची नोकरी लागण्याची शक्यता असल्यानं विपुलच्या वडिलांनी कर्ज काढून विपुलला शिकवलं. शिक्षण संपण्याआधीच काही कंपन्यांसोबत नोकरीसंदर्भात चर्चाही सुरू होती. मात्र, त्याचवेळी कोरोना(Covid 19) बॉम्ब फुटला. विपुलला ज्या कंपनीत नोकरी मिळण्याची संधी होती त्याच कंपनीत अनेक लोकांना कामांवरून कमी करण्यात आलं. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेल्या विपुल आणि त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्नांचा कोरोनामुळे चुराडा झाला. काही दिवस नोकरी केल्यानंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं विपुलचं स्वप्न होतं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत लहान नोकरीही लागण्याचीही शक्यताहा उरला नाही. दोन वर्षानंतर विपुलला एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम मिळालं. मात्र,स्टार्टअप अपेक्षेप्रमाणं भरारी घेत नसल्यानं उद्योजकांनी अनेकवेळा बिजनेस मॉडेल बदललं . खासगी क्षेत्रात चांगली नोकरी मिळत नसल्यानं विपुलनं सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केलेत.

भारतात कोरोनामुळे अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक पदवीधारक तरुण नोकरीची संधी शोधत होते. अशातच कोरोनाकाळात अनेकजणांची नोकरी गेल्यानं बाजारात फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झालं. त्यातुलनेत नोकरीच्या फार कमी संधी उपलब्ध आहेत. विपुलसारख्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणंही जवळपास दुरापास्तच झालं इतर देशांच्या तुलनेत भारतात पदवीधारकांना कमी पगार मिळतो. कोरोनाच्या अगोदर भारतात करार तत्वावर मोठ्या प्रमाणात नोकरी देण्याच्या प्रथा सुरू झाल्या. अशा नोकरीत पगार तुटपुंजा असतो आणि सामाजिक सुरक्षा नसते असं निरीक्षण विविध रोजगार सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.