Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या भाषणाबाबतचं हे रेकॉर्ड तुम्हाला माहितीय का? सर्वात जास्त वेळ आणि कमी वेळ कुणाचं भाषण होतं?
देशाचा अर्थसंकल्प सादर करत असतांना कमी आणि जास्त वेळेत अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी चर्चेत येत असतो.
नवी दिल्ली : 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. केंद्रीय अर्थमंत्री ( Nirmala Sitaraman) हा अर्थसंकल्प सादर केला जातो. आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प ( Budget 2023) सादर केला जाणार असून 11 वाजेची वेळ त्यासाठी निश्चित आहे. 31 जानेवारीला राष्ट्रपती यांचं अभिभाषण झाल्यानंतर देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर 31 जानेवारीला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झाल्यानंतर आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहे. पूर्वी छपाई केलेला अर्थसंकल्प असायचा आता टॅबच्या (Tab) माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यावरूनच अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपलं अर्थसंकल्पीय भाषण करणार आहे. याच काळात भाषण करण्याच्या काही नोंदी आहे. त्यामध्ये सर्वाधिक मोठं भाषण करण्याचा विक्रम निर्मला सीतारमण यांच्याच नावावर आहे. तर सर्वाधिक कमी भाषण करण्याचा विक्रम एच.एम पटेल यांच्या नावावर आहे.
विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री यांच्या नावावर सर्वाधिक मोठं भाषण करण्याचा विक्रम असला तरी यंदाचं त्यांचे भाषण किती वेळेचे असणार याकडे लक्ष लागून आहे.
1 फेब्रुवारी 2020 ला निर्मला सीतारमण यांनी केलेले भाषण सर्वात मोठे होते. त्यावेळी विशेष बाब म्हणजे त्यांनी शेवटची दोन पाने तब्येत बरी नसल्याने वाचली नव्हती.
2020 ला अर्थसंकल्पाचे भाषण करत असतांना त्यामध्ये 18 हजार 926 शब्द होते, तर ती वाचण्यासाठी त्यांनी 2 तास 42 मिनिटे भाषण केले होते, आणि हेच भाषण आत्तापर्यंतचे सर्वात मोठे भाषण राहिले आहे.
या आधीही 2019 ला अर्थसंकल्प सादर केला तेव्हा निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प वाचण्याचा विक्रम केला होता, त्यावेळी 2 तास 15 मिनिटांचे भाषण केले होते, तेव्हाही सीतारमण यांच्याच नावावर हा विक्रम होता.
यापूर्वी अधिक मोठे भाषण करण्याचा विक्रम 2003 मध्ये झाला होता. विक्रम जसवंत सिंग यांनी 2 तास 13 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले होते, त्या नंतरचा विक्रम अरुण जेटली यांच्या नावावर होता, 2014 मध्ये त्यांनी 2 तास 10 मिनिटांचे भाषण केले होते.
सर्वात कमी कालावधीचे भाषण करण्याचा विक्रम हिरूभाई एम पटेल यांच्या नावावर आहे. त्यांनी फक्त 800 शब्दांचे भाषण केले होते. 1977 मध्ये त्यांनी हा विक्रम केला असून काही मिनिटांत त्यांनी हे भाषण केले होते.
यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असतांना निर्मला सीतारमण यांचा इतिहास पाहता त्यांचे भाषण अधिक मोठे होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचे भाषण असल्याने यंदाच्या वर्षीय विक्रम होण्याची शक्यता आहे.
बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा