Share and Mutual Fund : शेअर आणि म्युच्युअल फंडात 1 लाख कोटी पडून, तुमचे असतील तर असा करा क्लेम

Share and Mutual Fund : शेअर आणि म्युच्युअल फंडात जवळपास एक लाख कोटी रुपये तसेच पडून आहेत. या भल्यामोठ्या रक्कमेवर कोणीच दावा केलेला नाही. यामध्ये तुमचे पण शेअर, म्युच्युअल फंडात रक्कम असेल तर असा करा दावा

Share and Mutual Fund : शेअर आणि म्युच्युअल फंडात 1 लाख कोटी पडून, तुमचे असतील तर असा करा क्लेम
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 10:58 AM

नवी दिल्ली : भारतीय बँका, विमा कंपन्यांकडे विना दावा केलेली मोठी रक्कम, ठेव (Unclaimed Amount) सातत्याने वाढत आहे. अनक्लेम्ड डिपॉझिट, शेअर, लाभांश, म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांसमोर या रक्कमेचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे. या रक्कमेवर दावा सांगायलाच कोणी येत नसल्याने आता दावेदारांचा, त्यांच्या नातेवाईकांचा, वारसदारांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी विहित प्रक्रिया सुरु करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी त्यासाठी एक विशेष मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. शेअर आणि म्युच्युअल फंडात जवळपास एक लाख कोटी रुपये तसेच पडून आहेत. या भल्यामोठ्या रक्कमेवर कोणीच दावा केलेला नाही. यामध्ये तुमचे पण शेअर (Share), म्युच्युअल फंडात (Mutual Fund) रक्कम असेल तर तुम्हाला असा दावा करता येईल.

वारसदाराची शोध मोहीम केंद्र सरकारचे पहिले उद्दिष्ट वारसदारांचा थांगपत्ता शोधणे आहे. त्यांना त्यांच्या कुटुंब प्रमुखाने जी काही रक्कम ठेव म्हणून ठेवली आहे, तिचा लाभ वारसांपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येणार आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात विना दावा ठेव रक्कम 48,262 कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर आरबीआयच्या वार्षिक रिपोर्टनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात 39,264 कोटी रुपयांची अनामत ठेव तशीच पडून आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशातील बँकांमध्ये सर्वात मोठी विना दावा रक्कम आहे.

विमा कंपन्या प्रभावित जीवन विमा कंपन्यांमध्ये 31 मार्च, 2021पर्यंत 22,043 कोटी रुपयांवर कोणीच दावेदार नाही. तर नॉन-लाईफ इन्शुरस्न कंपन्यांकडे 31 मार्च, 2021 पर्यंत 1,241.81 कोटी रुपयांवर कोणीच दावा सांगितलेला नाही. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडेच 21,538.93 कोटी रुपये पडून आहेत. त्याच्यावर कोणीच दावा सांगितलेला नाही. यामध्ये 2911.08 कोटी रुपयांचे व्याज रक्कम पण समाविष्ट आहे.

हे सुद्धा वाचा

इतकी रक्कम केली हस्तांतरीत मार्केट रेग्युलेटर सेबीने माहिती दिली. त्यानुसार, म्युच्युअल फंडात 31 मार्च, 2021 पर्यंत 1590 कोटी रुपयांच्या रक्कमेवर कोणीच दावा सांगितला नाही. यामध्ये 671.88 कोटींचे अनक्लेम्ड रिडेम्पशन आणि 918.79 कोटी रुपयांचे दावा न केलेला लाभांश आहे. तसेच विना दावा शेअरची संख्या पण खूप मोठी आहे. जवळपास 117 कोटी शेअर्स गुंतवणूकदारांचे प्रशिक्षण आणि संरक्षण निधीत (IEPF) हस्तांतरीत करण्यात आले आहे.

बँक वेबसाईटवर मिळेल माहिती अनक्लेम्ड डिपॉझिट रक्कम मिळविण्यासाठी बँकेशी संपर्क साधवा. विनादावा किती रक्कम आहे, याची माहिती बँकांच्या वेबसाईटवर मिळते. विना दावा रक्कमेवर दावा सांगण्यासाठी तुम्हाला विहित कागदपत्रे सादर करावे लागतील. यामध्ये खातेदाराचे पॅनकार्ड, जन्मतारखेचा पुरावा, नाव आणि पत्ता हे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यावरुन त्या खात्यात किती रक्कम पडून आहे, याची माहिती मिळेल.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.