सावधान! तुमच्याकडेही 15 वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन आहे? …तर तुम्हाला बसू शकतो मोठा आर्थिक फटका

एक एप्रिल 2022 पासून पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनाचे पुन्हा रजिस्ट्रेशन करणे महाग होणार आहे. (Vehicle Reregistration) जुन्या वाहनाचे रजिस्ट्रेशन रिन्यू (Registration renewal) करण्यासाठी पुढील महिन्यापासून जवळपास आठ पट जादा रक्कम मोजावी लागणार आहे.

सावधान! तुमच्याकडेही 15 वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन आहे? ...तर तुम्हाला बसू शकतो मोठा आर्थिक फटका
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 5:40 AM

नवी दिल्ली : एक एप्रिल 2022 पासून पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनाचे पुन्हा रजिस्ट्रेशन करणे महाग होणार आहे. (Vehicle Reregistration) जुन्या वाहनाचे रजिस्ट्रेशन रिन्यू (Registration renewal) करण्यासाठी पुढील महिन्यापासून जवळपास आठ पट जादा रक्कम मोजावी लागणार आहे. 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनाचे रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी पुढील महिन्यापासून सहाशे रुपयांऐवजी पाच हजारांचा खर्च होणार आहे. तर ज्या ग्राहकांकडे 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी दुचाकी (Old bike) आहे, अशा ग्राहकांना रजिस्ट्रेशन रिन्यूवेशनला 300 रुपयांऐवजी 1 हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या इम्पोर्टेड गाड्यांसाठी 15 हजार ते चाळीस हजारांपर्यंत खर्च येणार आहे. जुन्या वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. वाहनांपासून होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्याचा सरकारचा प्लॅन आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन रिन्यू शुल्कात वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर नव्या नियमानुसार 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांना दर पाच वर्षांनी रजिस्ट्रेशन रिन्यू करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

फिटनेस टेस्टचे दर देखील वाढले

यासोबतच 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या प्रवासी वाहनांच्या फिटनेस टेस्टच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. वाहतूक मंत्रालयाने ठरवलेल्या नव्या दरानुसार टॅक्सच्या फिटनेस टेस्टसाठी एक हजार रुपयांऐवजी सात हजार रुपये भरावे लागणार आहे. म्हणजेच फिटनेस टेस्ट खर्चात देखील दुप्पट वाढ होणार आहे. 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी ट्रक असल्यास तिच्या फिटनेस टेस्ट साठी दीड हजारांऐवजी साडेबाराहजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच आठ वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांसाठी फीटनेस प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्क्रॅप पॉलिसी

केंद्र सरकारच्या वतीने जुन्या वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्क्रॅप पॉलिसी सुरू करण्यात आली आहे. पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांच्या मालकाने रिन्यूवेशनचा खर्च टाळण्यासाठी स्क्रॅप पॉलिसीचा पर्याय निवडावा यासाठी फीटनेस टेस्ट आणि रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तुम्ही तुमचे जुने वाहन स्क्रॅप केल्यास तुम्हाला दुसरे नवे वाहन खरेदी करताना टॅक्समधून देखील काही प्रमाणात सूट देण्यात येते.

संबंधित बातम्या

महागाईचा भडका! हिंदुस्थान युनिलिव्हरचा ग्राहकांना धक्का; चहा, कॉफीच्या भावात 14 टक्क्यांची वाढ

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा श्रीलंकेला फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या भारतात काय स्थिती?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.