AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm वर कारवाईचा बडगा, आता तुमच्यावर काय होणार परिणाम

Paytm RBI Action | भारतीय फिनटेक कंपन्यांमध्ये पेटीएम हे मोठे नाव आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमला दणका दिला आहे. त्यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे. तर ग्राहकांना पण हा काय गोंधळ सुरु आहे. या कारवाईचा काय परिणाम होणार, त्यांचे खाते बंद होणार का, याबाबत संभ्रम आहे.

Paytm वर कारवाईचा बडगा, आता तुमच्यावर काय होणार परिणाम
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 9:28 AM

नवी दिल्ली | 2 February 2024 : अवघ्या काही वर्षांपूर्वी भारतीय नागरिकांना विना रोख रक्कम किराणा अथवा इतर वस्तू खरेदी करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता. आता तर गल्लीत येणाऱ्या भाजीपाला, हर एक मालवाल्यापासून ते मोठ-मोठ्या हॉटेलपर्यंत युपीआयचा बोलबाला आहे. पण या कॅशलेस पॅकेटच्या सुरुवातीला Paytm ने भारतीय नागरिकांना डिजिटल व्यवहाराची गोडी लावली. One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 38,600 कोटी रुपये इतके आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम धडक कारवाई केल्याने कंपनीच्या मूल्यामध्ये 9,700 कोटी रुपयांची घसरण आली आहे.

पेटीएमवर ही बंदी

  • RBI ने पेटीएमवर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आहेत.
  • 29 फेब्रुवारीनंतर पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही
  • 11 मार्चनंतर ग्राहक जोडण्याची प्रक्रिया बंद होईल
  • ग्राहकांना सध्या बँकेतून रक्कम काढण्यास परवानगी आहे
  • पण बँकिंग सेवा अवघ्या महिना भरातच ठप्प होईल

2009 मध्ये घेतली होती Paytm ने एंट्री

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशातील अलिगड येथील विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची सुरुवात झाली होती. ही कंपनी मोबाईल कंटेंट क्षेत्रात काम करत होती. विजय शर्मा यांनी कंपनीचे बिझनेस मॉडल बदलले. 2009 मध्ये Paytm ची सुरुवात केली. त्यानंतर डिजिटल युगात पेटीएमचे नाणे खणखणले.

ग्राहकांवर काय होईल परिणाम

  1. आरबीआयच्या या दणक्यानंतर पेटीएममधील गुंतवणूकदार आणि ग्राहक दोन्ही धास्तावले आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा यांनी या बंदीचा मोठा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. कंपनी आरबीआयच्या नियमांचे पालन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  2. शर्मा यांच्या मते, RBI ची बंदी ही केवळ पेटीएम पेमेंट्स बँक पुरतीच मर्यादीत आहे. त्याचा कंपनीच्या इतर सेवांवर परिणाम होणार नाही. ग्राहकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पेटीएम लवकरच एखाद्या बँकेसोबत हातमिळवणी करणार आहे. पेटीएमचे COO भावेश गुप्ता यांच्या मते, इक्विटी आणि विमा सेवांना बंदीचा फटका बसणार नाही.
  3. पण या ताज्या घडामोडींमुळे पेटीएमचे बाजारातील भांडवल कमालीचे घसरले आहे. पण पेटीएम संस्थापकांना या परिस्थितीतून लवकरच बाहेर पडण्याचे संकेत दिले. आता ग्राहक या 38,600 कोटी रुपये बाजार भांडवल असणाऱ्या कंपनीवर किती भरवसा ठेवतात, हे या महिन्यात समोर येईल.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.