1 एप्रिलला हलक्यात घेऊ नका! 1 एप्रिलपासून बजेट कोलमडण्याची दाट शक्यता, काय काय महागणार?
1st April : जागतिक बाजारात गॅसची किंमत वाढतेय. वेगानं वाढणाऱ्या गॅसच्या किंमतींनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते
मुंबई : 1 एप्रिल. नव्या आर्थिक वर्षाचा (2022-2023 Financial year) पहिलाच दिवस. हा दिवस सर्वसामान्यांसाठी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकीकडे कोरोना महामारी, दुसरीकडे युक्रेन-रशिया युद्धामुळे (Ukraine Russia War) वाढलेली महागाई, या सगळ्याचे पडसाद 1 एप्रिलच्या दिवशी संपूर्ण देशाला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अनेक गोष्टींची भाववाढ 1 एप्रिल रोजी होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जागतिक बाजारात गॅसची किंमत वाढतेय. वेगानं वाढणाऱ्या गॅसच्या किंमतींनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. डोमेस्टिक नॅचरल गॅसच्या किंमतीत नेमकी किती वाढ होते, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. नॅचरल गॅसची (Natural Gas) किंमत दुप्पट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातो आहे. त्यामुळे भारतात महागाईचा दर आणखी वाढेल, असं बोललं जातंय. सीएमजी, एलएनजीच्या किंमती त्यामुळे थेट वाढतील, असंही सांगितलं जातंय. 1 एप्रिल 2022 पासून ओल्ड ऑईल फिल्डसाठी नॅचरल गॅसची किंमत वाढून 6.1 डॉलर प्रचि मिलियन मॅट्रीक ब्रिटिश थर्मल युनिट होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या ही किमत 2.9 प्रति मिलियन मॅट्रिक ब्रिटिश थर्मल युनिक इतकी आहे.
वर्षातून दोनदा वाढतात नॅचरल गॅसच्या किंमती
सरकार एका वित्त वर्षात दोन वेळा नॅचरल गॅसच्या किंमतीत बदल करत. पहिला बदल हा 1 एप्रिलहा केला जातो तर दुसरा बदल हा 1 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जातो. सहा सहा महिन्यांच्या फरकानं हा बदल घोषित केला जातो. 1 एप्रिलला लागू केले जाणार दर 31 सप्टेंबरपर्यंत लागू केले जातात. तर 1 ऑक्टोबरपासून लागू केलेले दर 31 मार्चपर्यंत लागू करण्यात येतात.
गॅसची दरवाढ, कशावर थेट परिणाम?
गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याच तेल आणि गॅस कॉर्पोरेशन थेट फायदा होईल, असं मानलं जातं. त्यासोबत आईल इंडिया आणि रिलाईन्स इंडस्ट्रीज यांनाही थेट गॅसच्या दरवाढीमुळे फायदा होईल, असं सांगितलं जातंय.
सामान्यांचं बजेट कोलमडणार
जर नॅचरल गॅस महागला, तर घरगुती गॅसच्या किंमती आणखी वाढली. शिवाय पॉवर सेक्टरमध्येही मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रावरही थेट गॅस दरवाढीचा परिणाम जाणवणार आहे. या दरवाढीमुळे सगळ्याच गोष्टी महागतली. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या दोन महिन्यात महागाईचा दर हा 6 टक्क्यांपेक्षा कमाल मर्यादेला पार करत आला आहे.
महागलेल्या तेलाचा भारतावर परिणाम
कच्च्या तेलाच्या किंमती वाढून तर 10 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेल्या तर महागाई ही 0.20 ते 0.25 टक्क्यांनी वाढू शकते, असं डीबीएस बँकेनं म्हटलंय. तसंच भारताच्या विकासदरावरही याचा गंभीर परिणमा नोंदवला जाऊ शकतो. हा परिणाम 0.15 टक्क्यांपर्यंत होईल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
काय काय महाग होण्याची भीती?
- इंधन
- सीएनजी
- घरगुती गॅस
- व्यावसायिक गॅस
- गॅसचा वापर होणारे सर्व औद्योगित व्यवसाय
- इंधन महागल्यास भाज्या, फळांवरही थेट परिणाम
- दळणवळणाची सर्व साधनं महागण्याची शक्यता