Young Entrepreneurs : बंदा ये खास है! युट्यूब व्हिडीओ तयार करुन उभी केली 25,000 कोटींची कंपनी

Young Entrepreneurs : युट्यूब आजकाल अनेकांचा गुरु आहे. गुगलबाबानंतर अनेकांना येथूनच जगाचे अगाध ज्ञान मिळते. तर काहींसाठी हे कमाईचे साधन झाले आहे. काहीजण या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासाठी पाट्या टाकतात. तर एका तरुणाने या माध्यमातून कोट्यवधींची कंपनीच उभी केली आहे. कोण आहे हा तरुण..

Young Entrepreneurs : बंदा ये खास है! युट्यूब व्हिडीओ तयार करुन उभी केली 25,000 कोटींची कंपनी
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 5:33 PM

नवी दिल्ली : युट्यूब (Youtube) आजकाल अनेकांचा गुरु आहे. गुगलबाबानंतर अनेकांना येथूनच जगाचे अगाध ज्ञान मिळते. तर काहींसाठी हे कमाईचे साधन झाले आहे. जगात कोरोनाची लाट आल्यानंतर सर्वच जण घरात अडकले होते. अनेकांनी या काळात युट्यूबचा आधार घेतला. त्यांनी युट्यूबवर अनेक व्हिडिओतून काही ना काही शिक्षण पूर्ण केले. चलचित्र पटातून अनेकांनी माहिती मिळवली. तर काहींनी या युट्यूब त्यांच्या कमाईचे साधन बनवले. लोकांची रुचीचा शोध घेत, आयडियाच्या कल्पनेवर काम केले. त्यामाध्यमातून विविध विषयावरील व्हिडिओ पोस्ट केले आणि उत्पन्न मिळवले. एका तरुणाने तर या माध्यमातून कोट्यवधींची कंपनीच (Company) उभी केली आहे.  कोण आहे हा तरुण..

गौरव मुंजल (Gaurav Munjal) हे नाव कधी तुम्ही ऐकले आहे का? हा एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुंजलने मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. त्याची कंपनी भारतातील सर्वात मोठ्या ईटी टेक कंपन्यांपैकी एक आहे. गेल्यावर्षी, 2022 मध्ये त्याच्या कंपनीची नेटवर्थ, संपत्ती 3.4 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 25,000 कोटी रुपये इतकी होती. विशेष म्हणजे युट्यूब चॅनलवर व्हिडिओ तयार करुन त्याने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर गौरवला लाखमोलाची आयडिया सूचली. त्याने त्यावर काम केले. पाहता पाहता शिक्षण क्षेत्रात त्याचा अभिनव प्रयोग यशस्वी झाला.

आता ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीचं (Unacademy) नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. याविषयीच्या जाहिराती जवळपास सर्वच माध्यमातून तुम्ही पाहायल्या असतील. तर गौरव मुंजल हा अनअकॅडमीचा सीईओ आहे. युट्यूब चॅनलवरुन ही कंपनी उभी करण्यात आल्याचे सांगितल्यावर तुम्हा आश्चर्याचा धक्का बसेल. 2010 मध्ये गौरव मुंजालने त्याचे युट्यूब चॅनल सुरु केले होते. या चॅनलनेच पुढे जाऊन Unacademy ही कंपनी झाली. आज ही कंपनी जवळपास 25,000 कोटी रुपयांची आहे.

हे सुद्धा वाचा

गौरव मुंजलने त्याचा मित्र डॉ. रोमन सैनी (Roman Saini) आणि हिमेश सिंह यांच्या मदतीने त्याचे युट्यूब चॅनल सुरु केले. त्यानंतर शैक्षणिक प्लॅटफॉर्म तयार केला. बीटेकचं शिक्षण घेतानाच त्याने हा कारनामा केला. गौरव त्यावेळी या युट्यूब चॅनलवर कम्प्यटर ग्राफिक्स तयार करायचे याचा व्हिडिओ पोस्ट करत असे. त्याच्या युट्यूब चॅनलला चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर डॉ. रोमन सैनी या आयएएस अधिकाऱ्याचे त्याला मोलाचे सहकार्य मिळाले.

सुरुवातीला युट्यूबवरील अनअकॅडमी या चॅनलचे 24,000 सब्सक्राईबर्स होते. 2015 मध्ये डॉ. रोमन यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि त्यांनी युट्यूब चॅनलवर लक्ष केंद्रीत केले. 10 डिसेंबर 2015 रोजी दोघांनी मिळून युट्यूब चॅनलवरुन स्वतःची कंपनी स्थापन केली. दोघांनी नोकरी सोडून पूर्णवेळ अनअॅकडमी वाढविण्यावर खर्च केला. त्यांनी निधी जमवला. बायजू (Byju’s) या लर्निंग प्लॅटफॉर्मनंतर अनअकॅडमी हा भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणि व्हिडिओ तयार करुन ते अपलोड केले जातात. ऑनलाईन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंका निरसन करण्यात येते. Sequoia Capital India, नॅक्सस व्हेंचर्स, SAIF पार्टनर्स आणि Blume व्हेंचर्स हे या कंपनीचे गुंतवणूकदार आहेत.

गौरव मुंजाल यांनी अनअकॅडमी ही कंपनी उभी केली. तिचा विस्तार केला. सध्या या कंपनीचे सीईओ म्हणून ते 1.58 कोटी रुपये पगार घेतात. अनअकॅडमीवर सध्या 50 दशलक्ष वापरकर्ते आहेत. पण मुंजाल यांनी त्यापुढे पाऊल टाकले आहे. त्यांनी आता 37 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.