परकीय गंगाजळी आटली… 3.27 बिलियन डॉलरची घसरण, काय आहे कारण?

पुन्हा एकदा परकीय चलनाची गंगाजळी आटली आहे. 22 एप्रिलरोजी बंद झालेल्या सप्ताहात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात तब्बल 3.27 बिलियन डॉलरची घसरण झाली आहे. ही पडझड आता 600 बिलियन डॉलरच्या जवळ पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉरेन रिझर्व्हमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

परकीय गंगाजळी आटली... 3.27 बिलियन डॉलरची घसरण, काय आहे कारण?
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 11:36 AM

देशातील परकीय चलनाचा साठा (foreign exchange) 22 एप्रिलरोजी बंद झालेल्या सप्ताहात 3.27 अब्ज डॉलर घटून 600.423 अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व बँकेने शुक्रवारी जाहिर केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, याआधी 15 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहादरम्यान, यात 31.1 डॉलरची (dollars) कमतरता निर्माण झाली होती. परकीय चलन कमी होउन 603.694 अब्ज डॉलर शिल्लक होते. परकीय चलनातील घट ही परकीय चलन मालमत्ता (FCA)च्या कमतरतेमुळे झाली असून एफसीए हे एकूण चलन साठ्याचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून ओळखला जात असतो. एका आकडेवारीनुसार, 22 एप्रिल रोजी बंद झालेल्या सप्ताहात एफसीए 2.835 अब्ज डॉलर कमी होउन 533933 अब्ज डॉलर इतका शिल्लक राहिला होता.

आकडेवारीनुसार, देशातील सुवर्ण साठा 3.77 कोटी डॉलर घटून 42.768 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. आरबीआयने सांगितलय, की या सप्ताहात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) जमा विशेष आहरण अधिकार (SDR) 3.3 कोटी डॉलरने घटून 18.662 अब्ज डॉलर शिल्लक राहिला आहे. एका आकडेवारीनुसार, आयएमएफमध्ये ठेवण्यात आलेला चलनसाठा 2.6 कोटी डॉलर घटून 5.060 अब्ज डॉलर राहिला आहे.

शुक्रवारी रुपयाने घेतली 11 पैशांनी उसळी

हे सुद्धा वाचा

अमेरिकन चलनात काहीशी पडझड झाल्याने डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया शुक्रवारी 11 पैशांनी वधारला आहे. त्याचे मुल्य आता 76.52 प्रतिडॉलर इतके झाले आहे. विदेशी बाजारात अमेरिकन चलनाच्या मुल्यात काहीशी घसरण झाली आहे. इंटरबँक फॉरेक्स एक्सचेंज मार्केटमध्ये रुपया 76.62 प्रतिडॉलरने उघडला. व्यापारादरम्यान, रुपया 76.29 च्या उच्च आणि 76.63 च्या निच्च स्तरापर्यंत पोहचला होता. शेवटी 11 पैशांची बळकटी मिळाल्यावर तो 76.50 प्रतिडॉलरवर बंद झाला.

डॉलर इंडेक्समध्ये पडझडीचा परिणाम

एचडीएफसी सिक्युरिटीजचे दिलीप परमान यांच्या मते, चांगली विदेशी गुंतवणूक, डॉलर निर्देशांकात झालेली घसरण, आणि जोखमीच्या मालमत्तेत अपेक्षित सुधारणा यामुळे रुपयांमध्ये तेजी निर्माण झालेली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, बाजारातील सहभागींकडून कॅम्पस अ‍ॅक्टिव्हवेअरला अधिक सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर एलआयसीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमुळे गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

तीस शेअर्सवर आधारीत बीएसई सेन्सेक्स 460.19 अंकांनी घसरला आणि 57060.87 अंकांनी घसरून 17102.55 अंकांवर बंद झाला आणि NSE निफ्टी 142.50 अंकांनी घसरला. जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स 1.78 टक्क्यांनी वाढून 109.51 डॉलर प्रतिबॅरल झाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.