Share Market : झाडाखाली झाले सौदे, कसा आहे इतिहास, 150 वर्षांत इतका बदलला मुंबई शेअर बाजार

Share Market : BSE चा इतिहास अत्यंत रोचक आहे. कधीकाळी झाडाखाली शेअर बाजाराचे सौदे होत होते. गेल्या 150 वर्षांत मुंबई शेअर बाजार पार बदलून गेला आहे. असा झाला हा बदल..

Share Market : झाडाखाली झाले सौदे, कसा आहे इतिहास, 150 वर्षांत इतका बदलला मुंबई शेअर बाजार
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 4:35 PM

नवी मुंबई : भारतीय शेअर बाजार (Share Market) गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नवनवीन विक्रम नोंदवत आहे. कोरोना काळात तर भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला. अनेक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजाराशी जोडल्या गेले. दोन वर्षानंतर ते कमी पण झाले. सध्या बाजारात सुगीचे दिवस आहे. भारतीय शेअर मार्केट हे जगातील 5 वा सर्वात मोठा बाजार आहे. देशातील शेअर बाजाराची ओळख अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (BSE) होते. बीएसई केवळ भारताचा नाही तर आशियाचा पण जुना स्टॉक एक्सचेंज आहे. मुंबई शएअर बाजाराची सुरुवात 148 वर्षांपूर्वी 9 जुलै 1875 रोजी झाली होती.

अशी झाली सुरुवात आज बीएसई हा सर्वात मोठा शेअर बाजार आहे. या बाजाराने अनेक रेकॉर्ड नोंदवले. पण 148 वर्षांपूर्वी केवळ 5 लोकांनी बीएसईचा पाया घातला होता. एका वडाच्या झाडाखाली बीएसईची सुरुवात झाली होती. या झाडाखाली ट्रेडिंग सुरु झाले. आज भांडवलाच्या दृष्टीने बीएसई जगातील 11 वा सर्वात मोठा शेअर बाजार आहे.

148 पूर्वी BSE ची सुरुवात CNBC TV 18 च्या अहवालानुसार, 148 वर्षांपूर्वी 9 जुलै 1875 रोजी दक्षिण मुंबईतील टाऊन हॉलजवळ बीएसईची सुरुवात झाली होती. हा बाजार अनेक वर्षे तिथेच होता. 1980 मध्ये बीएसईचे कार्यालय पीजे टॉवर्समध्ये शिफ्ट करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

पहिले बिग बुल कोण बीएसईची स्थापना कॉटन किंग वा बिग बुल प्रेमचंद रॉयचंद यांनी केल्याचे मानण्यात येते. हा इतिहास 1855 मध्ये सुरु झाला होता. टाऊनहॉल जवळील वडाच्या झाडाखाली बसून शेअर दलाल ओरडून गुंतवणूकदारांना सौद्याची माहिती देत होते. येथेच सगळं व्यापार होत होता. दलालांची संख्या सातत्याने वाढत गेल्यावर या परिसराला दलाल स्ट्रीट असे नाव देण्यात आले. 1875 मध्ये एका ठिकाणी बीएसईच्या कामाला एका कार्यालयातून सुरुवात झाली.

असा झाला प्रवास 9 जुलै, 1875 रोजी दलालांनी द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने कामाला सुरुवात केली. ऑगस्ट 1957 मध्ये बीएसई सिक्योरिटीज कॉन्ट्रक्टस रेग्युलेशन अॅक्टअतंरग्त भारत सरकारने मान्यता दिली. सरकारने मान्यता दिलेला हा पहिला स्टॉक एक्सचेज आहे. त्यानंतर 1986 मध्ये देशातील पहिला इक्विटी इंडेक्स, S&P BSE SENSEX, 1978-79 मध्ये सुरु झाले. त्याचा बेस पॉईंट 1000 ठेवण्यात आला होता.

292 लाख कोटी रुपयांवर बीएसई मार्केट कॅप बीएसई आकड्यानुसार, बाजारात नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण भागभांडवल 292.12 लाख कोटींचे आहे. यापूर्वी बीएसईचा सर्वकालीन उच्चांकी मार्केट कॅप 291.25 लाख कोटी रुपये होता. 1 डिसेंबर 2022 रोजीचा हा आकडा आहे. या बाजारात वेगवेगळ्या कंपन्या सूचीबद्ध आहेत. यामध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या आहेत.

1000 हून 63 हजारांवर 1990 मध्ये पहिल्यांदा S&P BSE SENSEX 1000 अंकावर होता. तो आज 63,244 अंकावर आहे. म्हणजे या 33 वर्षोंमध्ये बीएसई सेन्सेक्समध्ये 60 पटींची उसळी घेतली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) हा भारताचा प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहे. 1990 मध्ये त्याची स्थापना झाली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.