तुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार

येत्या 1 ऑक्टोबरपासून सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. (5 Rule Will Change From 1 oct Will Have Effect Your Pocket)

तुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार
या व्यतिरिक्त, पात्र सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक पेन्शन मिळविण्यासाठीही योजनेचे प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. उमंग अॅपद्वारे योजनेच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचा फायदा म्हणजे आता लोकांना शारीरिकरित्या अर्ज करण्याच्या अडचणींपासून मुक्तता मिळेल.
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 9:43 AM

नवी दिल्ली : येत्या 1 ऑक्टोबरपासून सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. ज्यामध्ये ड्राइव्हिंग लायसन्स, आरोग्य विमा, फॉरेनला पैसे पाठवण्यावरील टीसीएस आदी महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश आहे. (5 Rule Will Change From 1 oct Will Have Effect Your Pocket)

ड्राइव्हिंग लायसन्स बनवणं सोपं होणार- रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या सुधारणांविषयी नोटिफिकेशन काढलं आहे. ज्यामध्ये मोटार वाहन नियमांची अधिक चांगली देखरेख आणि अंमलबजावणी करण्यााठी 1 तारखेपासून पोर्टलद्वारे वाहनांची कागदपत्रे आणि ई चलन ठेवता येणार आहे. नव्या नियमांनुसार ड्राइव्हिंग लायसन्स काढायला आता जास्त कागदपत्रांची गरज पडणार नाही.

विदेशात पैसे पाठवणं महागणार- परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनवला आहे. परदेशात पैसे पाठवण्यावरील टीसीएसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम नियम 1 तारखेपासून लागू होणार आहे.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मिळणार जास्त सुविधा- हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नवे बदल होणार आहेत. यामध्ये कमी दरामध्ये अधिक आजार कव्हर केले जाणार आहेत. हे बदल आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणित आणि ग्राहक केंद्रित करण्यासाठी केले जात आहेत. यात इतरही अनेक बदलांचा समावेश आहे.

GO Air ने बदलले विमानांचे टर्मिनल- GO Air ने 1 तारखेपासून टर्निनल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत तुम्ही जर GO Air च्या विमानाने प्रवास करणार असाल तर 1 तारखेपासून दिल्लीवरून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या सर्व देशांतर्गत उड्डाणे दिल्ली विमानतळावरून टर्मिनल नंबर 2 वरून होणार आहे.

बाजारात मिळणार ताजी मिठाई- बाजारामध्ये मिळणाऱ्या खुल्या मिठाईवरून सरकार सक्त पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित बदलेल्या नियमानुसार मिठाई दुकानदाराला मिठाई वापरण्याची अंतिम तारीख सांगावी लागेल. किती दिवस ती मिठाई खाण्यायोग्य असेल, याची माहिती दुकानदाराने ग्राहकाला द्यायला हवी. FSSAI ने खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

(5 Rule Will Change From 1 oct Will Have Effect Your Pocket)

संबंधित बातम्या

Vodafone ची धोबीपछाड, भारत सरकारविरोधात 20 हजार कोटींचा खटला जिंकला

वोडाफोननंतर आता एअरटेलचे रिचार्जही महागले, नव्या प्लॅनची किंमत किती?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.