5G in India : या महिन्यापासून 5G सेवा सुरू होणार, टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटप, कोणत्या शहरात मिळणार सेवा? वाचा सविस्तर…
5G in India : दूरसंचार विभागाला (DoT) 5G स्पेक्ट्रमचे आगाऊ पेमेंट म्हणून लिलाव यशस्वी दूरसंचार कंपन्यांकडून 17,876 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट मिळाले आहे. ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यताय.
नवी दिल्ली : 5G सेवेची (5G in India) प्रतीक्षा या महिन्यात संपू शकते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की 5G स्पेक्ट्रम दूरसंचार कंपन्यांना वाटप करण्यात आले आहे. आणखी कंपन्या 5G सेवा सुरू करण्याची तयारी करू शकतात. अशा परिस्थितीत कंपन्या या महिन्यापासून 5G सेवा सुरू करू शकतात. त्याच वेळी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाला (DoT) लिलावात यशस्वी दूरसंचार कंपन्यांकडून (Telecom Companies) 5G स्पेक्ट्रमचे (Spectrum) आगाऊ पेमेंट म्हणून 17,876 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट मिळाले आहे. रिलायन्स जिओने आधीच सूचित केले आहे की ते शक्य तितक्या लवकर सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सेवेची तयारी देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही सेवा लवकरच सुरू होऊ शकते.
बोली प्रक्रिया
- दूरसंचार कंपन्यांकडून 17,876 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट मिळाले
- रिलायन्स जिओने 7,864.78 कोटी रुपये
- व्होडाफोन आयडियाने 1,679.98 कोटी रुपये
- अदानी डेटा नेटवर्क्सने 18.94 कोटी रुपये दिले
- Jio ने 87,946.93 कोटी रुपयांच्या बोलीने विकल्या गेलेल्या सर्व स्पेक्ट्रमपैकी जवळपास निम्मे मिळवले आहे.
कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटप
5G Spectrum assignment letter issued. Requesting TSPs to prepare for the 5G launch: Information Technology Minister Ashwini Vaishnaw
(File Pic) pic.twitter.com/6uzbz5wpAR
— ANI (@ANI) August 18, 2022
कंपन्यांना स्पेक्ट्रम दिले
लिलावानंतर जमा झालेला पहिला हप्ता, सरकारने कंपन्यांना त्यांच्या यशस्वी बोलीच्या आधारे स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे. दूरसंचार विभागाला (DoT) 5G स्पेक्ट्रमचे आगाऊ पेमेंट म्हणून लिलावात यशस्वी दूरसंचार कंपन्यांकडून 17,876 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट मिळाले आहे. यामध्ये रिलायन्स जिओने 7,864.78 कोटी रुपये, व्होडाफोन आयडियाने 1,679.98 कोटी रुपये आणि अदानी डेटा नेटवर्क्सने 18.94 कोटी रुपये दिले आहेत. Jio ने 87,946.93 कोटी रुपयांच्या बोलीने विकल्या गेलेल्या सर्व स्पेक्ट्रमपैकी जवळपास निम्मे मिळवले आहे. तर भारती एअरटेलने 43,039.63 कोटी रुपयांना आणि व्होडाफोन-आयडियाने 18,786.25 कोटी रुपयांना स्पेक्ट्रम खरेदी केले. त्याच वेळी, गौतम अदानी यांच्या समूहाने 400 मेगाहर्ट्झसाठी 211.86 कोटी रुपयांची बोली लावली होती.
13 शहरांमध्ये सेवा
देशातील प्रथम 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद, गुरुग्राम, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, पुणे आणि लखनौ यांचा समावेश आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, 5G च्या सर्व चाचण्या पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत. सरकारने स्पष्ट केले की वाटप केलेले स्पेक्ट्रम देशातील सर्व मंडळांना कव्हर करण्यासाठी पुरेसे आहे, त्यामुळे लवकरच देशभरात सेवा उपलब्ध होऊ शकतात.