7th Pay Commission: नोव्हेंबरमध्ये 4 महिने जोडून मिळणार थकबाकी, DA-DR मध्ये चांगली वाढ

7th Pay Commission : सातव्या वेतन आयोगात मिळणाऱ्या पगाराच्या आधारे अधिकारी श्रेणीच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. जर एखाद्याचे मूळ वेतन सध्या 31,550 रुपये असेल, तर आतापर्यंत त्यांना 28% DR नुसार 8,834 रुपये मिळत होते. परंतु आता DR 3% वरून 31% वर वाढवल्यानंतर त्यांना DR म्हणून दरमहा 9,781 रुपये मिळतील.

7th Pay Commission: नोव्हेंबरमध्ये 4 महिने जोडून मिळणार थकबाकी, DA-DR मध्ये चांगली वाढ
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 4:28 PM

नवी दिल्लीः 7th Pay Commission : केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबरच्या पेन्शनमुळे केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई सवलतीचा (DR) लाभ मिळू शकेल. एवढेच नाही तर चार महिन्यांची थकबाकीही मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.

DR ची गणना मूळ वेतनावर केली जाते

1 जुलैपासून महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) 31 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या थकबाकीचाही नोव्हेंबरमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेय. हा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर झाला नसला तरी लवकरच तो अपेक्षित आहे, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलेय. विशेष म्हणजे DR ची गणना मूळ वेतनावर केली जाते. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन 20,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 600 रुपयांची वाढ होईल. ही वाढ 3 टक्क्यांच्या वर्धित डीआरच्या आधारावर असेल.

थकबाकी मिळेल

सातव्या वेतन आयोगात मिळणाऱ्या पगाराच्या आधारे अधिकारी श्रेणीच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. जर एखाद्याचे मूळ वेतन सध्या 31,550 रुपये असेल, तर आतापर्यंत त्यांना 28% DR नुसार 8,834 रुपये मिळत होते. परंतु आता DR 3% वरून 31% वर वाढवल्यानंतर त्यांना DR म्हणून दरमहा 9,781 रुपये मिळतील. दरमहा पगारात 947 रुपयांची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे वार्षिक पगारात 11,364 रुपयांची वाढ होणार आहे. ऑफिसर ग्रेड पगाराच्या आधारे हिशोब बघितला तर दरमहा DR 947 रुपयांनी वाढेल. म्हणजे चार महिन्यांची थकबाकी 3,788 रुपये असेल. जर आम्ही नोव्हेंबरचा वाढीव डीआर देखील समाविष्ट केला तर पेन्शनधारकांना 4,375 रुपये मिळतील.

मान्यता कधी मिळाली?

गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अशा प्रकारे 28 टक्के उपलब्ध डीए 31 टक्क्यांवर पोहोचला. नवीन डीए वाढीमुळे 47.14 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. नवीन महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर 9,488.70 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

जुलैपासून महागाई भत्ता वाढला

1 जुलै 2021 पासून डीएचा नवा दर लागू झाला आहे. कोविडमुळे सरकारने डीएची वाढ काही महिन्यांपासून प्रलंबित ठेवली होती. नुकतीच मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. कोविड महामारीमुळे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DR आणि DA चे 3 हप्ते रोखून ठेवले होते. DA नेहमी कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर मोजला जातो. यानंतर ते पगाराच्या इतर घटकांसह मूळ पगारात जोडले जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या एकूण पगारात आणखी वाढ होते.

संबंधित बातम्या

देशात महागाई आणखी वाढणार; ‘ही’ आहेत प्रमुख कारणं

अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जपान सरकारकडून मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा; प्रत्येक तरुणाला मिळणार एक लाख येन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.