7th Pay Commission: नोकरदारांना सातव्या वेतन आयोगाचा फायदा, तब्बल ‘इतके’ टक्के घसघशीत पगार वाढ मिळणार, तुम्हाला किती मिळणार?
देशभरातील एक कोटी पेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारक सातव्या वेतन आयोगाच्या रकमेची वाट बघत आहेत (7th pay commission latest news)
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवं वेतन आयोग लागू झालं असलं तरी अनेकांना अद्यापही त्याची रक्कम मिळालेली नाही (7th pay commission latest news). त्यामुळे देशभरातील एक कोटी पेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारक सातव्या वेतन आयोगाच्या रकमेची वाट बघत आहेत. कारण त्यांना सातव्या वेतन आयोगाची एकत्र रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगामुळे किती रुपये पगार वाढेल याचा हिशोब देशभरातील हजारो कर्मचारी करत आहेत. दरम्यान, सातवं वेतन आयोग लागू केल्यानंतर वाढलेल्या पगाराची रक्कम कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत येतील याबाबत सांगत येणार नाही. मात्र, पगार किती वाढेल यांचा अंदाज लावता येईल.
केंद्र सरकारने 29 जून 2016 रोजी सातवं वेतन आयोगाची शिफारस मान्य केली. त्यानुसार 1 जानेवारी 2016 पासून कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली आहे. मात्र, त्यांना अजूनही पगारवाढ मिळालेली नाही. पण सातवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढी शकतो? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (7th pay commission latest news).
पगारवाढ कशाप्रकारे झाली?
सहाव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी कमी होती. तर इतर अलाउंस जे होते ते जास्त होते. जसं की एन्ट्री लेव्हलला बेसिक पे हे सात हजार होतं तर DA हा बेसिक पेक्षा जास्त होता. इतर भत्ते आणि कपात पकडून कर्मचाऱ्याच्या हातात दर महिन्याला 14757 रुपये पडायचे. त्यानंतर सातवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर ग्रॉस पेमध्ये वाढ झाली. विशेष म्हणजे आता बेसिक सॅलरी 18 हजारांवर करण्यात आली आहे. तर इतर अलाउंसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
किती पगार वाढेल?
पगारवाढ ही प्रत्येक ग्रेडच्या आधारावर केली गेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये 23.55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खरंतर कर्मचारी त्यांच्या बेसिक सॅलरीच्या 2.57 पटीने आपल्या पगाराचा अंदाज बांधू शकतात. आता सर्व भत्ते वेगवेगळ्या प्रकारे दिले जातील. ते भत्ते किती द्यावे याबाबत सरकार निर्णय घेईल. या भत्तांच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला ते समजेल.
मिनिमम पगार 18 हजार असेल
सातवं वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, एन्ट्री लेव्हलच्या सरकारी कर्मचाऱ्यांची मिनिमम सॅलरी ही 7 हजार रुपयांपासून 18 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नव्या क्लास-वन ऑफिसरची नियुक्ती झाल्यानंतर त्याची सॅलरी ही 56,100 रुपये इतकी असेल. जर ओव्हरॉल विचार केला तर सातव्या वेतन आयोगामुळे पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये जवळपास 23.55 टक्क्यांच्या वाढीची शिफारस करण्यात आली आहे.
हेही वाचा : Video : जीव झाला येडापिसा रात रात जागनं….शालूची ही झकास अंदा पाहिली का?