8.1 टन सोने अवघ्या काही तासांत विकले, सामान्य लोकांवर काय परिणाम?

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, जगातील सर्वात मोठ्या ईटीएफ एसपीडीआर होल्डिंग्जने शुक्रवारी 8.1 टन सोने विकले, जी या वर्षातील सर्वात मोठी एक दिवसाची विक्री आहे. एसपीडीआरचे एकूण सोने धारण 1,000.79 टनांवरून 992.65 टनांवर आलेय.

8.1 टन सोने अवघ्या काही तासांत विकले, सामान्य लोकांवर काय परिणाम?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 7:35 AM

नवी दि ल्लीः व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी बातमी समोर आलीय. जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) ने खुल्या बाजारात 8 टनांपेक्षा जास्त सोने विकलेय, जी एका वर्षातील सर्वात मोठी विक्री आहे. जगभरातील गुंतवणूकदार सध्या सोन्यात पैसे गुंतवण्याचे टाळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण आर्थिक हालचालींच्या तीव्रतेमुळे शेअर बाजारात विक्रमी तेजी आहे. पुढील काही महिन्यांत सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. मोठ्या ब्रोकरेज हाऊसनेही सोन्याच्या लक्ष्याबाबत त्यांचे अंदाज बदललेत.

…म्हणून 8 टन सोने विकले

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, जगातील सर्वात मोठ्या ईटीएफ एसपीडीआर होल्डिंग्जने शुक्रवारी 8.1 टन सोने विकले, जी या वर्षातील सर्वात मोठी एक दिवसाची विक्री आहे. एसपीडीआरचे एकूण सोने धारण 1,000.79 टनांवरून 992.65 टनांवर आलेय.

सोने का विकायचे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एसपीडीआर होल्डिंग्जच्या विक्रीचा मुद्दा स्पष्ट आहे, सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची आशा कमी आहे. एसपीडीआर सध्याच्या स्तरावर नफा बुक करत आहे. इक्विटी मार्केटच्या परताव्यामुळे सोन्याची उच्च पातळीवर विक्री होत आहे. येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आशा कमी आहे.

आता पुढे काय?

रत्ने आणि दागिने उद्योगात एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा उद्योगाला आहे, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. पुढील तीन महिन्यांत शहरांमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून खरेदी वाढू शकते, असा त्यांचा विश्वास आहे. या कालावधीत मागणी 28 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

U-Gov Bomnibus द्वारे 17-20 ऑगस्ट 2021 दरम्यान देशातील 2,021 लोकांमध्ये एक ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या 5 पैकी तीन लोकांनी आपल्या कुटुंबासाठी सोने खरेदी करण्याविषयी बोलले आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 69 टक्के लोकांचे म्हणणे आहे की दिवाळी आणि सणासुदीला सोने खरेदीसाठी सर्वोत्तम काळ आहे.

2020 मध्ये कोविडमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रत्ने आणि दागिने उद्योगाने या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये सोन्याची मागणी पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु कोरोना विषाणूच्या महामारीची दुसरी लाटेमुळे मागणीत फारशी वाढ झालेली नाही.

संबंधित बातम्या

चांगली बातमी! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजारांच्या खाली, जाणून घ्या नवीन दर

वाढत्या महागाईमुळे तुमच्यावरील कराचा बोजा कमी होणार, कसे ते जाणून घ्या

8.1 tons of gold sold in just a few hours, what effect on the general public?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.