Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! BPCL च्या खासगीकरणामुळे 8.4 कोटी LPG ग्राहकांना मिळणार नाही गॅस?

खासगीकरणानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (BPCL) अनुदान देण्यात अडथळा येणार आहे. LPG Gas Connection विक्री सुरू ठेवण्यासाठी सवलत देण्याची आधीपासूनची योजना आहे.

मोठी बातमी! BPCL च्या खासगीकरणामुळे 8.4 कोटी LPG ग्राहकांना मिळणार नाही गॅस?
bpcl
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 3:11 PM

नवी दिल्लीः BPCL disinvestment: देशातील उत्पादित एलपीजी गॅस कनेक्शनचा (LPG Gas Connection) पुरवठा केवळ सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीच करावा, असा दोन दशकांपूर्वीचा एलपीजी पुरवठा आदेश आहे. ज्यामुळे खासगीकरणानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (BPCL) अनुदान देण्यात अडथळा येणार आहे. LPG Gas Connection विक्री सुरू ठेवण्यासाठी सवलत देण्याची आधीपासूनची योजना आहे. (8.4 crore LPG customers will not get gas due to privatization of BPCL?)

सध्या BPCL कडे 8.4 कोटींपेक्षा जास्त घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन

ओएनजीसी आणि गेल यांसारख्या कंपन्या बीपीसीएलच्या खासगीकरणानंतर एलपीजीचा पुरवठा कंपनीला करू शकतात की नाही हे तपासण्यासाठी आता कायदेशीर मत मागविण्यात आलेय. सध्या बीपीसीएलकडे 8.4 कोटींपेक्षा जास्त घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनचे ग्राहक आहेत. त्यापैकी 2.1 कोटी उज्ज्वला ग्राहक आहेत. यासाठी कंपनीच्या स्वतःचे घरगुती गॅस उत्पादन पुरेसे नाही. अन्य तेल विपणन कंपन्यांप्रमाणे बीपीसीएल ही कंपनी ओएनजीसी आणि गेल इंडिया लिमिटेड तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसारख्या खासगी कंपन्यांकडून एलपीजी खरेदी करते.

गॅस केवळ स्वदेशी कंपनीला विकता येतो

एलपीजी (नियमन व पुरवठा व वितरण) आदेश 2020, जे एलपीजी कंट्रोल ऑर्डर 2000 म्हणून प्रसिद्ध आहे, ते फक्त सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनाच लागू होते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि BPCL ला स्वदेशी उत्पादित एलपीजी विक्रीची तरतूद आहे. या आदेशात ओएनजीसी आणि गेल यांसारख्या कंपन्यांनी उत्पादित एलपीजी गॅस खासगी कंपन्यांना पुरविण्यास बंदी घातलीय. समांतर एलपीजी विक्रेत्यांना खासगी क्षेत्रातील एलपीजी विक्रेत्यांना आयातीत गॅस वापरावा लागतो.

सरकार घेतेय कायदेशीर सल्ला

देशात एलपीजीची कमतरता लक्षात घेता नियंत्रण आदेश 2000 जारी करण्यात आलाय. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकदा बीपीसीएलचे खासगीकरण झाल्यावर या आदेशामुळे ओएनजीसी आणि गेलला बीपीसीएलला एलपीजी विक्री करण्यास बंदी घालण्यात येईल. म्हणूनच सरकार या विषयावर कायदेशीर मताचा विचार करत आहे.

संबंधित बातम्या

LIC IPO: एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारपेठेत, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजुरी: सूत्र

‘या’ बँकेत 5 रुपयांत सुरू करा खाते, पासबुक व डेबिट कार्ड मिळतं मोफत, विम्याची सुविधाही

8.4 crore LPG customers will not get gas due to privatization of BPCL?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.