उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 8.8 कोटी LPG गॅस कनेक्शन जारी

या व्यतिरिक्त उज्ज्वला 2.0 योजना यंदा 10 ऑगस्ट रोजी एक कोटी एलपीजी कनेक्शन विनातारण देण्यासाठी लॉन्च करण्यात आली होती. तेल विपणन कंपन्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात PMUY अंतर्गत एकूण 1.64 लाख LPG कनेक्शन दिलेत. एलपीजी कनेक्शन जारी करणे ही एक सतत प्रक्रिया आहे आणि एलपीजी वितरकांना नवीन एलपीजी कनेक्शनसाठी कोणतीही विनंती त्वरित नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 8.8 कोटी LPG गॅस कनेक्शन जारी
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 8:14 PM

नवी दिल्लीः तेल विपणन कंपन्यांनी उज्ज्वला 2.0 आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत आतापर्यंत देशभरात 8.8 कोटी एलपीजी कनेक्शन जारी केलेत, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी दिली. पुरी यांनी राज्यसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना हे सांगितले. सभागृहात गोंधळ सुरू असताना त्यांनी ही माहिती दिली. त्यावेळी विरोधी सदस्यांनी 12 निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.

उज्ज्वला योजनेंतर्गत देशभरात 8.8 कोटी एलपीजी कनेक्शन जारी

पुरी म्हणाले की, 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत तेल विपणन कंपन्यांनी उज्ज्वला 2.0 आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत देशभरात 8.8 कोटी एलपीजी कनेक्शन जारी केलेत. पीएमयूवाय योजना 1 मे 2016 रोजी देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिला सदस्यांच्या नावे तारण न ठेवता आठ कोटी एलपीजी कनेक्शन जारी करण्यासाठी सुरू करण्यात आली होती आणि या योजनेचे लक्ष्य सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.

उज्ज्वला 2.0 योजनादेखील लॉन्च

या व्यतिरिक्त उज्ज्वला 2.0 योजना यंदा 10 ऑगस्ट रोजी एक कोटी एलपीजी कनेक्शन विनातारण देण्यासाठी लॉन्च करण्यात आली होती. तेल विपणन कंपन्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात PMUY अंतर्गत एकूण 1.64 लाख LPG कनेक्शन दिलेत. एलपीजी कनेक्शन जारी करणे ही एक सतत प्रक्रिया आहे आणि एलपीजी वितरकांना नवीन एलपीजी कनेक्शनसाठी कोणतीही विनंती त्वरित नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

एक कोटी स्वयंपाकाचा गॅस मोफत वाटण्यात येणार

2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आणखी एक कोटी एलपीजी कनेक्शन वाढवण्याची तरतूद केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 अंतर्गत वितरीत केल्या जाणार्‍या या एक कोटी एलपीजी कनेक्शनमध्ये भरलेले सिलिंडर आणि स्टोव्ह मोफत दिला जाणार आहे. उज्ज्वला योजना-2 चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना फार कमी औपचारिकता कराव्या लागतील आणि स्थलांतरित कामगार कुटुंबांना रेशन कार्ड किंवा पत्ता पुरावा लागू करण्याची आवश्यकता नाही. यासाठी स्वयं-घोषणापत्र पुरेसा असेल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

>> अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम pmuy.gov.in या उज्ज्वला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. >>यानंतर ‘Apply For New Ujjwala 2.0 Connection’ वर क्लिक करा. >> पेजच्या तळाशी तुम्हाला तीन पर्याय (इंडेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी) दिसतील म्हणजे गॅस कंपन्यांचा पर्याय असेल. >> तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा. >> त्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा. >> कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमच्या नावावर एलपीजी गॅस कनेक्शन जारी केले जाईल.

संबंधित बातम्या

4 विमान कंपन्यांवर विमानतळ प्राधिकरणाचे 2700 कोटी थकीत, एअर इंडियाचे सर्वाधिक पैसे

Gold Silver Price Today : सोने खरेदी करणे महागले, नेमकी किंमत किती?

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.