AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात! DA मध्ये होणार पुन्हा भरघोस वाढ

7th Pay Commission : मोदी सरकार पुन्हा एकदा मेहरबान झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात राहतील. या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागेल. महागाईच्या जमान्यात त्यांना डीएतील वाढीमुळे दिलासा मिळेल.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाचही बोटं तुपात! DA मध्ये होणार पुन्हा भरघोस वाढ
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 7:29 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकार येत्या काही महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government) मोठं गिफ्ट देऊ शकते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पाचंही बोटं तुपात असतील. मोदी सरकारने (Modi Government) आताच कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली होती. आता मोदी सरकार यावर्षी दुसऱ्या सहामहीत महागाई भत्त्यात (Dearness Allowance) पुन्हा 4 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. केंद्राने जुलै 2023 मधील पहिल्या सहामहीसाठी डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना आशा आहे की, मोदी सरकार डीएत 4 टक्के वाढीचं गिफ्ट देऊ शकते. हा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्क्यांहून 46 टक्क्यांपर्यंत वाढेल.

DA असा होतो निश्चित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनवेळा महागाई भत्ता देण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येते. जानेवारीत महागाई भत्ता निश्चित करण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी मिळणार आहे. जुलै महिन्याचा निर्णयही पार सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतो.

वर्षांतून दोनदा होते वाढ दुसऱ्या सहामहीसाठी डीएमध्ये वाढीचा प्रस्ताव सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येऊन केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करते. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, वर्षांतून दोन वेळा डीएमध्ये वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई दरानुसार केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करते.

हे सुद्धा वाचा

तर इतका वाढेल पगार जर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली तर डीए 42हून 46 टक्के होईल. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये आहे आणि 42 टक्क्यांच्या हिशोबाने 7560 रुपये डीए होईल. तर डीएत अजून 4 टक्क्यांची वाढ झाल्यास दुसऱ्या सहामहीत हा आकडा 8280 रुपये होईल. म्हणजे महिन्याच्या पगारात 720 रुपयांची वाढ होईल.

अशी लागली लॉटरी केंद्र सरकारने अनेक दिवसानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला. जुलै 2021 मध्ये त्यांनी महागाई भत्ता वाढवला. हा भत्ता 17 टक्क्यांहून 28 टक्के करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 नंतर पुन्हा तीन वेळा भत्त्यात वाढ झाली. हा भत्ता 31 टक्क्यांवर पोहचला. मोदी सरकारने मार्च 2022 मध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांची वाढ केली. त्यानंतर हा भत्ता 34 टक्क्यांवर पोहचला. आता दोन वेळा 4-4 टक्क्यांची वाढ झाल्याने हा भत्ता 42 टक्के झाला आहे.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.