दिग्गज व्यक्तीची भारताबाबत मोठी भविष्यवाणी, भारताच्या जवळपास ही नसणार चीन
गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात घसरण झाली असली तर येत्या काळात भारतासाठी मोठी संधी असणार आहे. तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि बॅकरूम प्रोसेसिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर त्यांचा भर आहे. डॉलर आणि रुपयाची ताकद काय असेल याबाबत त्यांनी भविष्यवाणी केली.
मोबियस इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंडचे अध्यक्ष मार्क मोबियस यांची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. भारत आणि चीनच्या बाजारपेठेवर त्यांनी भाष्य केले आहे. याशिवाय डॉलरची ताकद आणि गुंतवणूक धोरण यावर देखील त्यांनी मत मांडले आहे. भारतीय बाजारात तेजी कायम राहिल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पुढील 18 महिन्यांत तुम्हाला भारतात 20% पर्यंत परतावा मिळू शकतो असं त्यांनी भाकित केलंय. ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काचा फायदा भारताला होईल. यामुळे उत्पादन चीनमधून भारतात स्थलांतरित होईल. चीनबाबत ते उत्साही दिसत नाही. चीन हा भारताच्या वेगाने सावरू शकणार नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.
मोबियस यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रासाठी 50% गुंतवणूक केली आहे. त्यांचं कारण देखील त्यांनी सांगितलंय. काही विशिष्ट कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणुक केलीये. त्यांचा फंड तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषत: सॉफ्टवेअर कंपन्या आणि बॅकरूम प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहे.
गेल्या काही आठवड्यात भारतामध्ये घसरण दिसून आली. पण चीनच्या बाजारात तेजी दिसून आली. याचे कारण म्हणजे डॉलरची ताकद. त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकन बाजाराकडे आकर्षित होत आहेत. डॉलर हा मजबूत राहील. पण आता त्याची गती थांबणार आहे. त्यांना रुपयाची फारशी घसरण अपेक्षित नाही.
चीनच्या बाजारात दिसत असलेली तेजी फार काळ टिकणार नाही. मोबियसच्या म्हणण्यानुसार, चीन अपेक्षेप्रमाणे जलद पुनर्प्राप्ती करू शकणार नाही. चीन आता मोठी अर्थव्यवस्था बनलाय. त्यामुळे 5%, 6%, 7% विकास दर गाठणे त्यांना कठीण आहे. चीनमधील खाजगी क्षेत्रावर अजूनही दबाव आहे. त्यामुळे विकासाचा वेग मंदावलाय. इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर कंपन्या मात्र याला अपवाद आहेत.
भारतीय बाजारात झालेल्या घसरणीतून भारत लवकरत सावरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भारताची भविष्यातही कामगिरी चांगली असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीपैकी 50% गुंतवणूक भारतात केली आहे. पुढील 12 ते 18 महिन्यांत भारतीय बाजारपेठेत 20% पर्यंत परतावा मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढल्याने भारत आणि चीनवर याचा परिणाम होईल असं म्हटलं जातं होतं. पण ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारताला फायदा होईल. यामुळे उत्पादन चीनमधून भारतात येईल. चीनमध्ये वृद्धत्वाची लोकसंख्या जास्त आहे. तसेच विकासदर घटत आहे. त्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कंपन्या चीनमधून भारतात येतील. इतर देशात पण ते जाऊ शकतात. पण अधिक फायदा भारताला होईल असं त्यांना वाटतं.