GST Protest : तर भारत बंदची हाक! जीएसटीविरोधआत व्यापा-यांचा संताप, केंद्र सरकारला दिला अल्टिमेटम

GST Protest News : अन्नधान्य व खाद्यान वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास एक दिवसीय संपाची हाक देण्यात येणार आहे. पुण्यात व्यापारी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

GST Protest : तर भारत बंदची हाक! जीएसटीविरोधआत व्यापा-यांचा संताप, केंद्र सरकारला दिला अल्टिमेटम
तर भारत बंदची हाकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 2:29 PM

India Shutdown News : जीएसटी परिषदेने (GST Conference) नुकताच अन्नधान्यासह खाद्यांन्न वस्तूंवर 5 टक्के जीएसटी (5% GST) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वसामान्यांतून विरोध तर होतच आहे, पण आता या निर्णयाविरोधात व्यापा-यांनी (Traders) नुसतेच शड्डू ठोकले नाहीतर व्यापारी मैदानातही उतरले आहेत. पुण्यात काल राज्यातील व्यापा-यांची परिषद (Statewide trade conference) घेण्यात आली. त्यात राज्यात व्यापा-यांची संघर्ष समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सरकारने अन्नधान्यासह खाद्यांन्न वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास व्यापारी एक दिवसीय भारत बंदीची हाक (Call for nationwide Shutdown) देतील असा इशारा देण्यात आला आहे. या परिषदेत अनेक ठराव ही मंजूर करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यास त्याचा भूर्दंड सर्वसामान्यांना तर बसेलच पण व्यापा-यांना ही मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे व्यापा-यांनी हा निर्णय मागे घेण्याचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

उत्पादक, वितरक आणि ग्राहकाला फटका

अन्नधान्यासह खाद्यान वस्तू आतापर्यंत करमुक्त होत्या. या वस्तूंवर व्हॅटही आकारण्यात येत नव्हता. पण जीएसटी परिषदेच्या नव्या शिफारशीनुसार, पॅकिंग केलेल्या आणि लेकल लावलेल्या डाळी- कडधान्ये, आटा, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू होईल. त्याचा फटका अर्थातच उत्पादक शेतकरी, वितरक व्यापारी आणि खरेदीदार ग्राहकांना बसणार आहे. ही शिफारस स्वीकारु नये हा निर्णय रद्द करावा यासाठी व्यापारी पंतप्रधानांना निवेदन देणार आहेत. तसेच या निर्णयाला विरोध म्हणून 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रशासनाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मग आम्ही व्यवसाय कसा करावा

देशभरात छोटे किराणादार जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा व्यापार करतात. या वस्तूंवर जीएसटी लागू केल्यास तो भरावा लागेल. त्याचा हिसाब किताब ठेवावा लागेल. त्यासाठी एका माणासाची, कर्मचा-याची व्यवस्था करावी लागेल. हे छोट्या व्यापाा-याला शक्य नाही. मग व्यापा-यासमोर त्याचा परंपरागत व्यवसाय बंद केल्याशिवाय काय गंत्यतर आहे अशी प्रतिक्रिया व्यापा-यांनी दिल्या.

व्यापारी परिषदेतील ठराव

जीवनावश्यक वस्तूंवरील प्रस्तावित 5 जीएसटीचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा एक दिवसांच्या भारत बंदची हाक देण्याचा निर्णय

देशभरातील प्रत्येक राज्यात व्यापा-यांची संघर्ष समिती गठित करणार

12 जुलै रोजी प्रत्येक जिल्हा, तालुक्यात प्रशासनाला निवेदन देऊन विरोध दर्शवणार

प्लास्टिक बंदीला सरकारने पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सेस व्यापा-यांना भरण्याची अट रद्द करावी

बाजार समित्यांच्या खर्चासाठी एमआयडीसीच्या धरतीवर वार्षिक देखभाल खर्च घ्यावा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.