Reliance Jio : ‘नेट’ सेट गो! मोबाईलमध्ये इंटरनेटचे तुफान, रिलायन्सने खेळली जबरदस्त खेळी

Reliance Jio : जिओ वापरकर्त्याना आता अधिक स्पीडने इंटरनेट मिळणार आहे. रिलायन्सने त्यासाठी खास खटपट केली. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले. टेलिकॉम क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी खेळलेली ही खेळी इतर कंपन्यांची डोकेदुखी ठरणार आहे.

Reliance Jio : 'नेट' सेट गो! मोबाईलमध्ये इंटरनेटचे तुफान, रिलायन्सने खेळली जबरदस्त खेळी
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 8:42 AM

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीने (Reliance Industry) टेलिकॉम बाजारात धुराळा उडवून दिला आहे. एकाच खेळीने टेलिकॉम सेक्टर हलवून टाकले. जिओ वापरकर्त्यांना (Jio Users) आता हायस्पीड नेटचा आनंद घेता येईल. रियालन्सने त्यासाठी मार्च महिन्यापासून खास खटपट केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आता जिओ युझर्संना 5G आणि ब्रॉडबँडची झटपट सेवा मिळेल. त्यासाठी कंपनीने 60 दशलक्ष डॉलरचा व्यवहार केला आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होईल. त्यांना अधिक गतीने इंटरनेट सुविधा मिळेल. अनेकदा नेटवर्कमध्ये अडथळे येतात. ते पण बऱ्याच प्रमाणात कमी होतील. टेलिकॉम क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी खेळलेली ही खेळी इतर कंपन्यांची डोकेदुखी ठरणार आहे.

या कंपनीशी करार

रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ प्लॅटफॉर्मसाठी अमेरिकन संचार उपकरण निर्माता मिमोसा नेटवर्क्स (Mimosa Networks) खरेदी केले आहे. 5G आणि ब्रॉडबँडची झटपट सेवा मिळेल. त्यासाठी कंपनीने 60 दशलक्ष डॉलरचा व्यवहार केला. मिमोसाने या अधिग्रहणाची माहिती जाहीर केली. रेडिसिस कॉर्पोरेशन (Radisys Corporation) या सहायक कंपनीच्या माध्यमातून रिलायन्सने ही डील पूर्ण केली.

हे सुद्धा वाचा

काय होणार फायदा

या अधिग्रहणामुळे Jio ला त्यांची 5G आणि ब्रॉडबँड सेवांची क्षमात वाढविण्यास मदत मिळेल. या खरेदीमुळे जिओला मिमोसाच्या पॉइंट-टू-पॉइंट आणि पॉइंट-टू-मल्टी-पॉइंट उत्पादनांचा लाभ मिळेल. यावर्षी मार्च महिन्यातच रिलायन्स इंडस्ट्रीजने ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते.

काय आहे फीचर

  1. शुक्रवारी रिलायन्सने या अधिग्रहणावर अधिकृत मत दिले. त्यानुसार, मिमोसा कनेक्टिव्हिटी उत्पादनांची एक मोठी साखळी कंपनीच्या ताब्यात आली आहे. विना परवाना स्पेक्ट्रम बँडसाठी त्याचा वापर होईल. मिमोसाच्या पॉइंट-टू-पॉइंट आणि पॉइंट-टू-मल्टी-पॉइंट उत्पादनांचा लाभ जिओच्या सेवा विस्तारासाठी करण्यात येईल.
  2. मिमोसाच्या उत्पादन श्रेणीत मल्टि गीगाबिट प्रति सेंकद क्षमतेसोबतच हायस्पीड फिक्स्ड वायरलेस एक्सेस नेटवर्कचा वापर करते. त्यामुळे नेटवर्कची गती कायम असते. या नवीन दूरसंचार प्रणालीमुळे वायरलेस बॅकहॉल कनेक्टिव्हिटीसाठी मोठा उपयोग होईल.
  3. मिमोसाचे उत्पादन पोर्टफोलियो मध्ये वायफाय 5 आणि नवीनतम वायफाय 6ई तंत्रज्ञानासोबतच ट्विस्ट ऑन एंटेना संबंधीत सहायक उपकरणांचा समावेश आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जिओला टेलिकॉम मार्केटमध्ये मांड ठोकता येणार आहे. त्यांना ग्राहकांना मोठ्या सोयी-सुविधा पुरविता येतील.

Jio च्या प्लॅनमध्ये ऑफर

फ्रीमध्ये नेटफ्लिक्स पाहण्यासाठी Jio ने तगडा प्लॅन आणला आहे. या खास प्लॅनची ऑफर 699 रुपये आहे. या प्लॅनमध्ये फ्री OTT फायदा मिळतो. युझर्सला अनेक जोरदार फायदे मिळतात. त्यामुळे हा प्लॅन युझर्सला फायदेशीर ठरेल.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.