New IPO | आता पुन्हा मालामाल होण्याची संधी! 28 कंपन्यांचे IPO येणार, बाजारातून उभारणार एकूण 45,000 कोटी

New IPO | SEBI ने 28 कंपन्यांना 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल-जुलै दरम्यान इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आणण्यासाठी मान्यता दिली आहे. या IPO च्या माध्यमातून एकूण 45,000 कोटी रुपये उभारण्यात येणार आहे.

New IPO | आता पुन्हा मालामाल होण्याची संधी! 28 कंपन्यांचे IPO येणार, बाजारातून उभारणार एकूण 45,000 कोटी
मालामाल होण्याची संधी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 6:43 PM

New IPO | गुंतवणूकदारांना (Investment) पुन्हा मालामाल होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पण त्यासाठी पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे. गुंतवणुकीची ही संधी इनकॅश करण्यासाठी तुम्हाला पैसा तयार ठेवायला पुरेशा अवधी मिळणार आहे. बाजार नियमाक SEBI ने 28 कंपन्यांना 2022-23 या आर्थिक वर्षात (Fiscal Year) एप्रिल-जुलै दरम्यान प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) आणण्यासाठी मान्यता दिली आहे. या IPO च्या माध्यमातून एकूण 45,000 कोटी रुपये उभारण्यात येणार आहे. IPO साठी नियामक मान्यता मिळालेल्या कंपन्यांमध्ये जीवनशैली रिटेल ब्रँड फॅब इंडिया (FAB India), FIH मोबाईल्स आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपची उपकंपनी- भारत FIH, TVS सप्लाय चेन सोल्युशन्स, ब्लॅकस्टोन-समर्थित आधार हाउसिंग फायनान्स (Aadhar Housing Finance) आणि मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स आणि किड्स क्लिनिक इंडिया यांचा समावेश आहे.

तारखांची घोषणा नाही

मर्चंट बँकर्सनी स्पष्ट केले की, या कंपन्यांनी अद्याप त्यांचे IPO कधी बाजारात येतील याची तारीख जाहीर केलेली नाही. या कंपन्या ऑफर देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. सध्याची बाजाराची परिस्थिती आव्हानात्मक आहे. प्रशांत राव, संचालक, आनंद राठी इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इक्विटी कॅपिटल मार्केट्सचे प्रमुख यांनी ही असेच मत व्यक्त केले आहे. सध्याचे वातावरण आव्हानात्मक आहे आणि ज्या कंपन्यांना मान्यता आहे ते IPO लॉन्च (Launch) करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

28 कंपन्या रिंगणात

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जुलै 2022-23 या कालावधीत एकूण 28 कंपन्यांना IPO द्वारे भांडवल उभारणीसाठी नियामक मंजूरी मिळाली. या कंपन्यांनी मिळून 45,000 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे.

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 11 कंपन्यांनी IPO द्वारे 33,254 कोटी रुपये उभे केले आहेत. यातील मोठा भाग (20,557 कोटी) एलआयसीच्या आयपीओचा होता.

टाटा समूहाची कंपनीही आयपीओ आणणार

या टाटा टेक्नॉलॉजीची उपकंपनी टाटा मोटर्सच्या आयपीओ (IPO) साठी प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनीच्या नियोजनाप्रमाणे घडमोडी घडल्या तर, टाटा टेकचा (TATA Tech) आयपीओ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकतो. सुचीबद्ध यादीसह, टाटा टेक ही 2004 नंतर आयपीओ आणणारी पहिली समूह कंपनी असेल.

यापूर्वी, इनोव्हा कॅप्टाब लिमिटेड या औषध कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) द्वारे 900 कोटी रुपये उभारण्यासाठी प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार, प्रस्तावित IPO मध्ये 400 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. कंपनीचे प्रवर्तक आणि इतर भागधारकांद्वारे 96 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणली जाईल.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.