Old Mobile Sell : क्या आयडिया है सरजी! अशी धावत आली लक्ष्मी, जुन्या मोबाईलमुळे हा तरुण करोडपती

Old Mobile Sell : कोणं कुठं आणि कसं डोकं चालवेल हे काही सांगता येत नाही, बिझनेस करण्याची आयडिया असेल तर लाथ मारुन पाणी काढता येते. या तरुणाने असंच काही हटके केलं आणि आज तो करोडपती आहे.

Old Mobile Sell : क्या आयडिया है सरजी! अशी धावत आली लक्ष्मी, जुन्या मोबाईलमुळे हा तरुण करोडपती
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 11:36 AM

नवी दिल्ली : जगात पैसे कमविण्याचे अनेक प्रकार आहेत. तर अनेक बिझनेस आयडिया (Business Idea) पण आहेत. काही लोक तर भंगार विकून जोरदार कमाई करतात. आपल्या आजूबाजूला लक्ष दिले तर किरकोळ वाटणाऱ्या व्यवसायातून ते सहज लाखो रुपये कमाई करताना दिसतील. तर या तरुणाचे इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या (Electronic Waste) समस्याकडे लक्ष गेले आणि त्यातून त्याला व्यवसायाची नामी कल्पना सूचली. एमबीए पदवी मिळवलेल्या या तरुणाने मित्राच्या मदतीने 200 कोटींची कंपनी उभारली, ते ही जुन्या मोबाईलच्या विक्रीतून (Old Mobile Sell) . त्यातील काही पार्ट्सच्या उलाढालीतून हे तरुण आज कोट्याधीश झाले आहेत.

स्टार्टअपची कमाल साकेत सौरव आणि त्याचा मित्र अवनीत सिंह या दोघांनी या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावर शक्कल लढवली. दोघांची आज 200 कोटींची कंपनी आहे. रीफिट ग्लोबल (Refit Global) असे या कंपनीचे नाव आहे. 2017 मध्ये दोघांनी हे स्टार्टअप सुरु केले. या दोघांनी जुने मोबाईल विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला.

अशी झाली सुरुवात 2011 मध्ये इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियातून साकेतने एमबीए पूर्ण केले. त्यानंतर साकेत सौरवने अनेक कंपन्यांसोबत काम केले. 6 वर्षांनी 2017 मध्ये मोबाईल फोन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. मित्रासोबत त्याने रीफिट ग्लोबल (Refit Global) प्लॅटफार्मची सुरुवात केली. त्याने वितरण प्रणालीआधारे जुने मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक सामानाची विक्री सुरु केली. त्यात त्यांना मोठा दिलासा मिळाला.

हे सुद्धा वाचा

दुरुस्ती करुन विक्री जुन्या मोबाईलची विक्री करण्यापूर्वी साकेत आणि त्याचे मित्र मोबाईलची दुरुस्ती करुन विक्री करत होते. त्यानंतर त्यांनी जुन्या मोबाईल विक्रीची सुरुवात केली. त्यावेळी या कंपनीचा महसूल 8 कोटी, 19 कोटी, 24 कोटी आणि 44 कोटीपर्यंत पोहचला. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या कंपनीचे उत्पन्न 100 कोटी रुपयांच्या पुढे गेले. गेल्या आर्थिक वर्षांत हे उत्पन्न 200 कोटींच्या घरात पोहचले.

रीफिट ग्लोबलची यशोगाथा यॉर स्टोरीने दिलेल्या माहितीनुसार, रीफिट ग्लोबलने फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, ओप्पो, श्याओमी आणि विवो या कंपन्यांकडून एक्सचेंज ऑफरनंतर आलेले मोबाईल फोन खरेदी केले. या मोबाईलमधील तांत्रिक अडचणी, समस्या दूर केल्या. हा फोन दुरुस्तीनंतर विक्रीस तयार झाला. रीफिट ग्लोबलने हे दुरस्त केलेले मोबाईल त्यांच्या वितरकांमार्फत पुन्हा बाजारात विक्री केले.

फ्लिपकार्टवर विक्री रीफिट ग्लोबल प्रत्येक मोबाईल 37 पॉईंटवर क्वालिटी चेक करते आणि समाधान होईपर्यंत या मोबाईलला वापरण्यास फिट घोषीत करत नाही. त्यानंतरच हा मोबाईल बाजारात विक्रीला पाठविण्यात येतो. मोबाईल फोनसह इतर इलेक्ट्रिक गॅझेट दुरुस्त करुन विक्री करण्यात येतात. या कंपनीचे 80 टक्के मोबाईल फ्लिपकार्टवर विक्री करण्यात येतात. याशिवाय अन्य ई-सेलर्स 20 टक्के फोनची विक्री करतात.

इतक्या फोनची विक्री गेल्यावर्षी या कंपनीने 5 लाख जुन्या मोबाईलची विक्री केली. साकेत सौरव यांनी सांगितले की, त्यांचे जुने मोबाईल नव्या मोबाईलच्या तुलनेत 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त आहेत. या आर्थिक वर्षात रीफिट ग्लोबलला 350 कोटी रुपयांच्या कमाईची अपेक्षा आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.