अभय भुतडा यांची सायरस पुनावाला ग्रुपमध्ये धोरणात्मक आणि मोठ्या भूमिकेसाठी पदोन्नती
अभय भुतडा यांची नुकताच पदोन्नती करण्यात आलीये. अभय भुतडा यांच्या दमदार नेतृत्त्वाखाली, मागील तीन वर्षांमध्ये पुनावाला फिनकोर्पने फार मोठी वाटचाल केल्याचे अदार पुनावाला यांच्याकडून सांगण्यात आलंय. नवीन मोठी जबाबदारी ही आता अभय भुतडा यांच्यावर देण्यात आलीये.
नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : नुकताच अभय भुतडा यांना पदोन्नती ही देण्यात आलीये. सायरस पुनावाला ग्रुपमध्ये धोरणात्मक आणि मोठ्या भूमिकेसाठी ग्रुपस्तरावर ही पदोन्नती देण्यात आलीये. याबद्दल बोलताना अदार पुनावाला म्हणाले की, मे 2021 मध्ये संपूर्ण कंपनीचे अधिग्रहण झाले तेव्हा अभय भुतडा यांनी या अधिग्रहणाचे नेतृत्त्व केले. विशेष म्हणजे तेंव्हापासून त्यांनी संपूर्ण कंपनीत यशस्वीपणे बदल घडवून आणले. त्यांनी पुनावाला फिनकोर्पला तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या उत्कृष्ट आणि प्रयत्नांनी मजबूत केले. त्यांनी कंपनीला सध्याच्या अतिउत्तम असलेल्या अशा असामान्य स्थितीत वेगाने पुढे नेले.
पुढे अदार पुनावाला म्हणाले, अभय भुतडा यांचे नेतृत्त्व, अंमलबजावणीची कौशल्ये आणि व्यावसायसंबंधीची कुशाग्रबुध्दी पाहता, अभय भुतडा यांना ग्रुपस्तरावर उच्च श्रेणीची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. ते सायरस पुनावाला ग्रुपमध्ये धोरणात्मक आणि मोठी भूमिका बजावतील. ही भूमिका ग्रुपचे धोरण, गुंतवणूक आणि वित्त व्यवस्थापन करण्यासंबंधी राहणार आहे. पुनावाला फिनकोर्प लिमिटेडच्या बोर्डावर गैरकार्यकारी संचालक (नॉन-एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर) म्हणून कायम राहतील.
अभय भुतडा यांच्या दमदार नेतृत्त्वाखाली, मागील तीन वर्षांमध्ये पुनावाला फिनकोर्पने फार मोठी वाटचाल नक्कीच केली आहे. ही वाटचाल वाढ, मजबूत मालमत्ता गुणवत्ता स्ट्राँग असे क्वॉलिटी, क्रिसिल AAA रेटिंग, उत्कृष्ट नफाबद्दल आहे. तसेच ती जे उत्पादन 21,000 कोटी भारतीय रुपयांपेक्षा (INR) अधिक एएमयू (असेट अंडर मॅनेजमेंट) गाठते. अशा पोर्टफोलियोंना डायव्हरसीफाय करण्याबाबतही आहे. पोर्टफोलियोंना डायव्हरसीफाय करणे म्हणजे आर्थिक गुंतवणुकीत विविधता आणणे.
आम्ही नवीन बिझनेस व्हर्टिकल्स विकसित करित असताना आणि वाढीचा पुढचा टप्पा गाठत असताना अरविंद कपिल सामील होत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. ते एमडी आणि सीईओ म्हणून सामील होणार आहेत. कपिल एचडीएफसी (HDFC) बँकेत सात लाख कोटी भारतीय रुपयांचे बुक व्यवस्थापित करतात.
कपिल हे हार्वर्ड बिझनेस स्कूलसारख्या जगविख्यात शैक्षणिक संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मॅनेजमेंट आणि इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते पंचवीस वर्षांहून अधिक एचडीएफसी बँकेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने हे नमूद केले आहे, असेही अदार पुनावाला यांनी नुकताच म्हटले आहे. अभय भुतडा यांना आता नवीन एक जबाबदारी नक्कीच देण्यात आलीये.