‘या’ बँकांच्या ग्राहकांसाठी खुशखबर; आर्थिक व्यवहार होणार झटपट
Banks | खासगी क्षेत्रातील HDFC, ICICI, Axis आणि IndusInd या खासगी बँकांनी यादृष्टीने प्रायोगिक स्तरावर काम करायला सुरुवात केली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास बँकांकडून नव्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या जातील.
नवी दिल्ली: एखाद्या बँकेत खाते उघडायचे असल्यास किंवा कर्ज घ्यायचे असल्यास कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये बराच वेळ वाया जातो. मात्र, अलीकडच्या काळात अनेक बँका अकाऊंट एग्रीगेटर या तत्त्वावर काम करताना दिसतात. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. तुम्हाला ही माहिती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहण्याची गरज पडत नाही.
खासगी क्षेत्रातील HDFC, ICICI, Axis आणि IndusInd या खासगी बँकांनी यादृष्टीने प्रायोगिक स्तरावर काम करायला सुरुवात केली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास बँकांकडून नव्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या जातील.
याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, कोटक महिंद्रा आणि आयडीएफसी फर्स्ट या बँकाही अकाऊंट एग्रीगेटर प्लॅटफॉर्मशी जोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भविष्यात Finvu, Onemoney, NADL आणि CAMS हे अकाऊंट एग्रीगेटर या बँकांसोबत काम करताना दिसतील.
अकाऊंट एग्रीगेटर्स म्हणजे काय?
Account Aggrigators या एकप्रकारच्या बिगरबँकिंग वित्तीय संस्था असतात. या संस्था ग्राहकांची आर्थिक माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्या आणि मागणी करणाऱ्या कंपन्यांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात. या संस्थांच्या माध्यमातून बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध होऊ शकतात. मात्र, त्यासाठी ग्राहकांच्या परवानगीची आवश्यकता असते.
फायदा काय होणार?
ग्राहकांनी अकाऊंट एग्रीगेटर्स डेटा शेअर करण्याची परवानगी दिल्यानंतर कोणत्याही नव्या बँकेशी किंवा संस्थेशी व्यवहार करताना प्रत्येकवेळी नव्याने कागदपत्रे सादर करण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणखी जलद गतीने पार पडतील.
इतर बातम्या:
देशातील बँका, म्युच्युअल फंडस आणि विमा कंपन्यांकडे 82,000 कोटी रुपये धूळ खात पडून
Zomato चा आयपीओ आज बाजारपेठेत, किती शेअर्स विकत घेऊ शकता, किंमत किती?
‘या’ राज्यात उभारले जाणार देशातील सर्वात मोठं सोलर पार्क, काय होणार फायदा?