कराड जनता बँक कोणी बुडवली? बॅक खातेदार राजेंद्र पाटलांचे गंभीर आरोप

कराड जनता बँक दिवाळखोरीत निघाली नसुन रिझर्व्ह बँक, सहकार खाते आणि संचालक मंडळाने ठरवून पद्धतशीरपणे बँकेची लुट केली असल्याचा आरोप बॅक खातेदार राजेंद्र पाटील यांनी केला आहे.

कराड जनता बँक कोणी बुडवली? बॅक खातेदार राजेंद्र पाटलांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 12:12 PM

कराड : सातारा जिल्ह्यातील नावाजलेल्या ‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. पण बँकेची ठरवून लूट केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कराड जनता बँक दिवाळखोरीत निघाली नसुन रिझर्व्ह बँक, सहकार खाते आणि संचालक मंडळाने ठरवून पद्धतशीरपणे बँकेची लुट केली असल्याचा आरोप बॅक खातेदार राजेंद्र पाटील यांनी केला आहे. (account holder Rajendra Patil has alleged Karad Janata Bank was robbed by the Reserve Bank Co-operation Department)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक खातेदार राजेंद्र पाटील यांनी बँकेत बोगस कर्ज वाटप होत असल्याबाबत 2015 साली मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 550 कोटी ठेवी असणाऱ्या कराड जनता बँकेतून 425 कोटी कर्ज वाटप झाले. त्यातील चारच खाते दारांना 390 कोटींचे बोगस कर्ज वाटप करण्यात आले. या कर्जात आजपर्यंत एक रुपायाही परत आला नाही. याकडे वेळीच रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली. मात्र, पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात करण्यात आल्याचा आरोप राजेंद्र पाटील यांनी केला आहे.

राजेंद्र पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे कराड जनता बँकेला नेमकं कुणी बुडवलं अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. दरम्यान, कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे या घोषणेनंतर आता ठेवीदारांच्या पैशांचं काय?, असा प्रश्व विचारला जाऊ लागला आहे.

संचालकांवर 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा

कराड जनता बँकेचा व्याप मोठा आहे. सहकारातून उभ्या राहिलेल्या या बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच मुंबई येथे शाखा आहेत. या बँकेच्या महाराष्ट्रात एकणू 29 शाखा आहेत. तर सध्या या बँकेचे 32 हजार सभासद आहेत. सभासदांची संख्या लक्षात घेता या बँकेचा व्याप मोठा असल्याचे लक्षात येते. मात्र, बँकेच्या संचालकांवर 310 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला; तसा गुन्हाही त्यांच्या विरोधात नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 2017 साली रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले होतेे. यानंतर या बँकेच्या अर्थकारणाचा आलेख घसरल्याचे सांगण्यात येत आहे.

मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरसुद्धा (Mantha Urban Cooperative Bank) निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर 2020 पासून पुढच्या सहा महिन्यांसाठी या बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत. (account holder Rajendra Patil has alleged Karad Janata Bank was robbed by the Reserve Bank Co-operation Department)

इतर बातम्या – 

महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?

Fact Check : मोदी सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 60 हजार?

(account holder Rajendra Patil has alleged Karad Janata Bank was robbed by the Reserve Bank Co-operation Department)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.