अदानी ग्रुपचा मोठा डाव, 20 देशांमध्ये कामकाज असणारी ही कंपनी विकत घेण्याच्या तयारीत
अदानीने डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नोलॉजीजने भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी एमआरओ कंपनी एअर वर्क्समधील 85.8 टक्के भागभांडवल विकत घेण्यासाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अदाणी समूह एक मोठी डिल करण्याच्या तयारीत आहे. अदानी समुह एअरक्राफ्ट्स देखरेख, दुरुस्त करणाऱ्या सर्व्हिस पाहणारी कंपनी घेण्याच्या तयारीत आहे. या कराराचे मूल्य 400 कोटी रुपये आहे. अदाणी एंटरप्राइजेज लिमिटेडची सहायक कंपनी अदाणी डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नोलोजिज लिमिटेडने एअर वर्क्स इंडिया (इंजीनियरिंग) प्रायव्हेट लिमिटेडने 85.8% शेअर होल्डिंग मिळवण्यासाठी करार केला आहे. एअर वर्क्स भारताची प्रमुख प्रायव्हेट एअरक्राफ्ट मेंटेनेन्स कंपनी आहे.
एअर वर्क्स कंपनीत 1,300 कर्मचारी
एअर वर्क्स कंपनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपनीला सर्व्हिस देते. सध्या अदानी ग्रुपकडे सात एअरपोर्ट आहेत. तसेच एक एमआरओ ऑपरेट करते. या डिलमध्ये विमान क्षेत्रात अदानी यांची परिस्थिती अधिक मजबूत होणार आहे. एअर वर्क्स कंपनी देशातील 35 शहरांमध्ये ऑपरेशनल करते. कंपनीत 1,300 पेक्षा जास्त कर्मचारी आहे. 20 देशांमध्ये कंपनीचे कामकाज आहे. एअर वर्क्स फिक्स्ड-विंग आणि रोटरी-विंग दोन्ही पद्धतीच्या विमानांची सर्व्हिसची सेवा देते.
अदानी ग्रुपकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अदानीने डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नोलॉजीजने भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी एमआरओ कंपनी एअर वर्क्समधील 85.8 टक्के भागभांडवल विकत घेण्यासाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे. अदानी समुहाची अदानी डिफेन्स अँड एअर वर्क्स कंपनी अत्याधुनिक संरक्षण उत्पादन आणि डिझाइन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात काम करत आहे.
एअर वर्क्स कंपनीला जगातील 20 पेक्षा जास्त देशांमध्ये नागरी विमानन प्राधिकरणांकडून नियामकीय मान्यता मिळाली आहे. नागरी उड्डाण क्षेत्रातील अग्रणी एअर वर्क्सने लष्करी एमआरओ उपक्रमांमध्येही लक्षणीय क्षमता विकसित केली आहे. तसेच भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे अनेक प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.
अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी म्हणाले, भारतीय विमान वाहतूक उद्योग आता जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा उद्योग आहे. येत्या काही वर्षांत 1,500 हून अधिक विमानांची भर यामध्ये घालण्यात येणार आहे. ही वाढ देशाच्या कानाकोपऱ्यात हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. ज्यामुळे विमान सेवांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत.