हिंडनबर्गला पछाडण्यासाठी आदानी मैदानात, अमेरिकेतील नामांकीत लॉ फर्म लढणार लढा

भारतात अदानी समूहाचे काम अमरचंद मंगलदास फर्म करते. ही फर्मचे संचालक गौतम अदानी यांच्या नात्यातील आहेत. या फर्मने अमेरिकेतील लॉ फर्म वाचटेलला संपर्क केला आणि हिंडनबर्ग विरोधात खटला लढण्याचे काम दिले.

हिंडनबर्गला पछाडण्यासाठी आदानी मैदानात, अमेरिकेतील नामांकीत लॉ फर्म लढणार लढा
पुन्हा संकट
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 7:03 PM

नवी दिल्ली : अमेरिकेतून हिंडेनबर्ग नावाचे वादळ येते अन् भारतात गौतम अदानींचे संपूर्ण साम्राज्य हादरून जाते. संसदेपासून शेअर मार्केटपर्यंत फक्त अदानींचीच चर्चा होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता 21 व्या क्रमांकावर गेले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता अदानी समूह कायदेशीर लढण्यासाठी तयार झाला आहे. भारतात अदानी समूहाचे काम अमरचंद मंगलदास फर्म करते. या फर्मने अमेरिकेतील लॉ फर्म वाचटेलला संपर्क केला आणि हिंडनबर्ग विरोधात खटला लढण्याचे काम दिले.

अदानी यांची तयारी

गौतम अदानी यांनी हिंडनबर्गविरोधात आर-पारची लढाई लढण्यासाठी तयार केली आहे. त्यासाठी अमेरिकेतील सर्वात महागडी फर्म वॉचटेलची नियुक्ती केली आहे. कॉर्पोरेट वादातील खटले लढण्यासाठी ही फर्म प्रसिद्ध आहे. यासंदर्भात फायनान्सीयल टाईम्स दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण करण्यासाठी अदानी समूहाने तयारी केली आहे. भारतात अदानी समूहाचे काम अमरचंद मंगलदास फर्म करते. या फर्मने अमेरिकेतील लॉ फर्म वाचटेल (Wachtell) ला संपर्क केला आणि हिंडनबर्ग विरोधात खटला लढण्याचे काम दिले.

हे सुद्धा वाचा

अशी आहे वाचटेल

वाचटेल लॉ फर्म वादग्रस्त प्रकरणांमध्ये कायदेशीर लढाई लढण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी 2022 मध्येही ही फर्म खूप चर्चेत होती. त्यावेळी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी $44 बिलियन ट्विटर डील तोडली होती. ट्विटरने त्यांना कोर्टात खेचण्यासाठी वॉचटेलची नियुक्ती केली. डेलावेअर कोर्टात, वॉचटेलने ट्विटरच्या वतीने लॉबिंग करत एलोन मस्कला करार पूर्ण करण्यास सांगितले.

काय आहे हिंडनबर्ग

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने (Nathan Anderson) 2017 मध्ये केली होती. ही एक आर्थिक संशोधन करणारी संस्था (Financial Research Firm) आहे.

इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते. या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही रंजक इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंकपासून आपल्या करियरला सुरुवात केली. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे.

चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.