एका रुग्णवाहिका चालकाचा अदानींना ‘जोर का धक्का’, एक दिवसात गमावले कोट्यावधी रुपये

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंकपासून आपल्या करियरला सुरुवात केली.

एका रुग्णवाहिका चालकाचा अदानींना 'जोर का धक्का', एक दिवसात गमावले कोट्यावधी रुपये
परिसस्पर्श
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 8:16 PM

नवी दिल्ली : अमेरिकेतील नावाजलेली गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg) एका अहवालाने भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी भूकंप आणला. या भूकंपाचा सर्वाधिक फटका आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांना बसला. त्यांची संपत्ती १.८४ लाख कोटीने कमी झाली. एका रिपोर्टमुळे त्यांचे २२ अब्ज डॉलरचे म्हणजे १.८४ लाख कोटींचे नुकसान झाले.

या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यानुसार, समूहाने शेअर्समध्ये फेरपार केली आणि लेखा परीक्षणात गडबडीचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात या अहवालाने अदानी समूहाची चिंता वाढवली. अदानी समूहाने अहवालातील आरोप फेटाळले आणि कायदेशीर कार्यवाहीची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. पण तोपर्यंत या अहवालाने मोठे नुकसान केले आहे. फोर्ब्स बिलेनियर्स इंडेक्स (Forbes Billionaires Index) नुसार, अदानी यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासात सुमारे १८ टक्क्यांची घसरण झाली.

काय आहे हिंडनबर्ग

हे सुद्धा वाचा

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने (Nathan Anderson) 2017 मध्ये केली होती. ही एक आर्थिक संशोधन करणारी संस्था (Financial Research Firm) आहे. इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते. या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही रंजक इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.

रुग्णवाहिकेवर चालक होते एंडरसन

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंकपासून आपल्या करियरला सुरुवात केली. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे. मार्कपोलोस हे सुद्धा एक विश्लेषक आहे. त्यांनी बर्नी मेडॉफ (Bernie Madoff) यांच्या एका योजनेचा भांडाफोड केला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.