adani group : एका रिपोर्टने महिन्याभरात अदानींचे केले किती कोटींचे नुकसान वाचाच

गौतम अदानी यांची संपत्ती केवळ $43.4 अब्ज इतकी कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत अदानीला 3.3 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

adani group : एका रिपोर्टने महिन्याभरात अदानींचे केले किती कोटींचे नुकसान वाचाच
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 5:20 PM

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना एका रिपोर्टमुळे बसलेले हादरे अजूनही जाणवत आहेत. एका अहवालामुळे गौतम अदानी (Adani Enterprises) यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण सुरुच आहे. तसेच त्यांची स्वतःची संपत्तीही कमी झाली आहे. गेल्या महिन्याभरात अदानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्याचा परिणाम त्याच्या संपत्तीवर झाला आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाल्यानंतर ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत खूप खाली आले आहेत.

मार्केट कॅप 8 लाख कोटी रुपयांच्या खाली

हे सुद्धा वाचा

समभागांच्या सततच्या घसरणीमुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप 8 लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. मंगळवारी 10 गटातील समभागांचे एकत्रित मार्केट कॅप 8 लाख 9 हजार 182 कोटी रुपये होते. दुसरीकडे, 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग अहवाल समोर येण्यापूर्वी समूहाची मार्केट कॅप 19 लाख 19 हजार कोटी होते. म्हणजेच गेल्या 28 दिवसांत त्यात सुमारे १० लाख कोटींची घट झाली आहे.

संपत्ती केवळ $43.4 अब्ज

एवढेच नाही तर फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती केवळ $43.4 अब्ज इतकी कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत अदानीला 3.3 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 26 व्या क्रमांकावर गेले आहे.

आज शेअर घसरले

बुधवारी अदानी समूहाचे सर्व 10 समभाग घसरले. प्रमुख कंपनी अदानी एटंरप्रायझेसचे समभाग 11.05% घसरून 1397 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्स देखील 7.24% घसरून 541 रुपयांवर आला. अदानी पॉवर, ट्रान्समिशन, ग्रीन एनर्जी, टोटल गॅस, विल्मर, एनडीटीव्ही, एसीसी आणि अंबुजा सिमेंट प्रत्येकी 5-5% ने घसरले.

काय आहे हिंडनबर्ग

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने (Nathan Anderson) 2017 मध्ये केली होती. ही एक आर्थिक संशोधन करणारी संस्था (Financial Research Firm) आहे.

इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते. या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही रंजक इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंकपासून आपल्या करियरला सुरुवात केली. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.