दीर्घ कालावधीनंतर अदानी समुहाचे शेअर वधारले

बाजारातील घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर अदानी समूहाच्या 10 पैकी 8 समभागांमध्ये वाढ झाली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जवळपास 15% वाढले.

दीर्घ कालावधीनंतर अदानी समुहाचे शेअर वधारले
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 5:18 PM

नवी दिल्ली : महिन्याभरापूर्वी 24 जानेवारी रोजी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या आयुष्यात वादळ आले. या वादळाचा जोर आता कमी होऊ लागला आहे. अमेरिकन संशोधन फर्म हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाची सुरु असलेली मोठी पडझड थांबली आहे. मंगळवारी अदानी समुहाचे 10 पैकी 8 समभागांमध्ये चांगली वाढ झाली. विशेष म्हणजे मंगळवारी शेअर बाजारात घसरण असताना अदानी समुहाचे शेअर वधारले होते.

मंगळवारी बाजारातील घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर अदानी समूहाच्या 10 पैकी 8 समभागांमध्ये वाढ झाली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जवळपास 15% वाढले. याशिवाय अदानी पोर्ट्स, विल्मर, पॉवर, ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्ही यांचे शेअर्स प्रत्येकी 5-5% वाढले. अंबुजा सिमेंट 3.74% आणि ACC 2.08% वाढले. दुसरीकडे, अदानी ट्रान्समिशन आणि टोटल गॅस सुमारे 5-5% नी घसरले.

हे सुद्धा वाचा

यामुळे झाली वाढ

अदानी समूहाने या वर्षी मार्च अखेरपर्यंत $690-790 दशलक्ष शेअर-बॅक्ड कर्जाची परतफेड करण्याची योजना आखली आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे 2024 बॉण्ड्सचे $800 दशलक्ष क्रेडिट तीन वर्षांच्या क्रेडिटसह पुनर्वित्त करण्याची योजना आहे. अदानी व्यवस्थापनाने मंगळवारी हाँगकाँगमधील समूहाच्या बाँडधारकांना या योजना सादर केल्या. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

NSE च्या 11 पैकी 6 विभागाच्या निर्देशांकात घसरण झाली. फार्मा क्षेत्रात सर्वाधिक 1.31% घसरण झाली. बँक, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी आणि मेटल क्षेत्रातही किरकोळ घसरण झाली. दुसरीकडे, माध्यम क्षेत्राला सर्वाधिक 2.46% वाढ मिळाली. रिअल्टी क्षेत्रात 1.14% वाढ झाली आहे. ऑटो, पीएसयू बँक आणि खासगी बँक क्षेत्रही किरकोळ वधारले.

महिन्याभरापूर्वी काय झाले

24 जानेवारी 2023 रोजी, अमेरिकेच्या शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानीबद्दल 106 पानांचा अहवाल जारी केला. यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत जगाचा दृष्टिकोनच बदलला. समूहाच्या शेअर्समध्येही वादळ आले. या अहवालामुळेच गौतम अदानी यांची वैयक्तिक संपत्तीही बुडाली. महिन्याभरापूर्वी जगातील टॉप 3 श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत असलेले गौतम अदानी आता जगातील टॉप 25 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.