Adani Wilmar Stock Price: भाऊ, हा शेअर एकदम सुसाट, थांबता थांबेना! अप्पर सर्किट केले ना क्रॉस
Adani Wilmar Upper Circuit : शेअर बाजारात अदानी समूहाची (Adani Group) नवी कंपनी अदानी विल्मरचा (Adani Wilmar) घौडदौड काही थांबताना दिसत नाही.
Adani Wilmar Upper Circuit : शेअर बाजारात अदानी समूहाची (Adani Group) नवी कंपनी अदानी विल्मरचा (Adani Wilmar) घौडदौड काही थांबताना दिसत नाही. या शेअरने रेकॉर्ड वर रेकॉर्ड नावावर नोंदवले आहे. आज बुधवारच्या व्यवहारात या शेअरला पुन्हा वरचे सर्किट (Upper Circuit) लागले. अवघ्या 230 रुपयांच्या इश्यू प्राइसमुळे (Issue Price) शेअरने अडीच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सातशे रुपयांच्या पुढे मजल मारली.अदानी विल्मरच्या शेअरमध्ये रिकव्हरी झाली होती आणि पहिल्याच दिवशी 18 टक्क्यांची जबरदस्त तेजीसह हा आयपीओ बंद झाला होता. लिस्टिंगनंतर त्याला सतत अप्पर सर्किट लागले आणि पहिल्या तीन दिवसांतच त्यात 60 टक्के वाढ झाली होती.अदानी विल्मरच्या आयपीओसाठी 218-230 रुपयांचा प्राइस बँड ठरवण्यात आला होता. सुमारे चार टक्के सवलतीसह शेअरने 221 रुपयांवर व्यापाराला सुरूवात केली. इतक्या कमी वेळेत हा शेअर 700 रुपयांच्या ही पुढे गेला आहे.
अप्पर सर्किटनंतर काहीशी घसरण
अदानी विल्मरचा शेअर आज 703.05 रुपयांवर वधारला. थोड्याच वेळात पुन्हा त्यावर अप्पर सर्किट लागले आणि शेअर 5 टक्क्यांनी वधारून 709.80 रुपयांवर पोहोचला. मात्र, त्यातही नंतर काहीशी घसरण दिसून आली. सकाळी 10:45 वाजता हा शेअर सुमारे 3 टक्क्यांनी वाढून 695 रुपयांवर ट्रेड करत होता. याआधी मंगळवारी अदानी विल्मरचा शेअर 676 रुपयांवर बंद झाला होता.
आयपीओला चांगला प्रतिसाद नाही
अदानी समूहाची ही कंपनी नुकतीच शेअर बाजारात सुचीबध्द (Listed) झाली आहे. खुल्या बाजारातील अदानी समूहाची ही सातवी आणि सर्वात नवीन कंपनी आहे. सवलतीत सुचीबध्द झाल्यानंतर या शेअरने सातत्याने विक्रम प्रस्थापित केले आहेत. आयपीओनंतर (Adani Wilmar IPO) त्याचा शेअर सुमारे 4% सवलतीत लिस्ट करण्यात आला होता. मात्र, यानंतर अदानी विल्मरच्या शेअरमध्ये रिकव्हरी झाली होती आणि पहिल्याच दिवशी 18 टक्क्यांची जबरदस्त तेजीसह हा आयपीओ बंद झाला होता. लिस्टिंगनंतर त्याला सतत अप्पर सर्किट लागले आणि पहिल्या तीन दिवसांतच त्यात 60 टक्के वाढ झाली होती.
केवळ 221 रुपयांवर सुचीबध्द
अदानी विल्मरच्या आयपीओसाठी 218-230 रुपयांचा प्राइस बँड ठरवण्यात आला होता. सुमारे चार टक्के सवलतीसह शेअरने 221 रुपयांवर व्यापाराला सुरूवात केली. इतक्या कमी वेळेत हा शेअर 700 रुपयांच्या ही पुढे गेला आहे. अदानी विल्मरचा शेअर बाजारात लिस्ट होऊन दोन महिने उलटले, पण इतक्या कमी वेळात त्याची किंमत तीन पटीने वाढली आहे.