26 रुपयांचा अदानींचा हा शेअर पोहोचला डायरेक्ट 600 रुपयांवर, छप्पड फाड के कमाई

शेअर मार्केटमध्ये अनेकांनी पैसे गुंतवून मोठी कमाई केली आहे. पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागारांचा नेहमी सल्ला घेतला पाहिजे अन्यथा चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान देखील होऊ शकते. आज आम्ही तुन्हाला अशा शेअर बद्दल सांगणार आहोत ज्याने बंपर कमाई केली आहे,

26 रुपयांचा अदानींचा हा शेअर पोहोचला डायरेक्ट 600 रुपयांवर, छप्पड फाड के कमाई
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 8:24 PM

Share Market : मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यामुळे लोकांची भरभराट झाली आहे. लोकं पैसे गुंतवून श्रीमंत झाले आहेत. बाजारात अनेक चढ-उतार सुरु असतात. पण काही शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. एकेकाळी २६ रुपयांना असलेला हा शेअर आज ६०० रुपयांच्या पुढे गेला आहे. या शेअने अवघ्या 4 वर्षांत लोकांना श्रीमंत बनवले आहे. हा शेअर उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीचा आहे. त्या कंपनीचे नाव आहे अदानी पॉवर. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये आजही वाढ होत आहे.

आज अदानी पावरचा हा शेअर 4 टक्क्यांहून अधिक उसळीसह 643.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करत आहे. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी चांगल्या आर्थिक सल्लागाराचा नेहमीच सल्ला घेतला पाहिजे. अन्यथा मोठं नुकसान देखील होऊ शकतं.

गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर या कंपनीचे शेअर्स सध्यातरी सातत्याने वाढत आहेत. गेल्या 5 दिवसांत स्टॉक 22 टक्क्यांहून अधिकने वाढला आहे. गेल्या एका महिन्यात, अदानी पॉवरच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर या त्याने गुंतवणूकदारांना 74 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एप्रिल 2020 मध्ये, अदानी पॉवरचे शेअर्स 26 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. तेव्हापासून त्यात मोठी वाढ झालीये. आज 4 एप्रिल 2024 रोजी कंपनीचे शेअर 643.10 च्या पातळीवर पोहोचला आहे. अदानी पॉवरचे बाजार भांडवल २.३८ लाख कोटी रुपये आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.

अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये लोकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यामुळे गुंतवणूकदारांना 1138 टक्के परतावा मिळाला आहे. अदानी पॉवर ही देशातील सर्वात मोठी औष्णिक वीज उत्पादक कंपनी आहे. तिची व्यावसायिक उत्पादन क्षमता १३,६५० मेगावॅट थर्मल आहे. ज्यांनी सुरुवातीला या शेअरमध्ये पैसे गुंतवले त्यांना मोठा फायदा आता झालेला आहे. कारण त्यांचा पैसा अनेक पटींनी वाढला आहे.

काही महिन्यांपूर्वी हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. शेअरची किमंत खाली आली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता अदानी यांच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.