अफगाणिस्तान ताब्यात घेतला पण तालिबानकडे विदेशी चलनाचा एक छदामही नाही, IMF चा कर्ज देण्यास नकार

Taliban | आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील सदस्य देशांना वेळोवळी कर्ज दिले जाते. जगातील 190 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत. मात्र, अफगाणिस्तानातील सत्ताबदलानंतर IMF ने वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे.

अफगाणिस्तान ताब्यात घेतला पण तालिबानकडे विदेशी चलनाचा एक छदामही नाही, IMF चा कर्ज देण्यास नकार
अफगाणिस्तान
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 11:48 AM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे. यामध्ये राजधानी काबूलचाही समावेश आहे. त्यामुळे लवकरच आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होईल.

मात्र, नव्या राजवटीची सुरुवात करताना तालिबानच्या मार्गात एक अडथळा निर्माण झाला आहे. भविष्यात इतर देशांशी व्यवहार करण्यासाठी तालिबानकडे परकीय चलनच उपलब्ध नाही. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) तालिबानला कर्ज देण्यास नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील सदस्य देशांना वेळोवळी कर्ज दिले जाते. जगातील 190 देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत. मात्र, अफगाणिस्तानातील सत्ताबदलानंतर IMF ने वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. अन्य देशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर तालिबानला कर्ज द्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका IMF ने घेतली आहे.

परकीय चलनच उरले नाही

तालिबानकडे सध्याच्या घडीला इतर देशांशी व्यवहार करण्यासाठीचे परकीय चलन उपलब्ध नाही. अफगाणिस्तानातील मध्यवर्ती बँकेकडे 9 अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा आहे. मात्र, हा साठा परदेशात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानकडे रोकड स्वरुपात परकीय चलन उपलब्ध नाही, अशी माहिती अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख अजमल अहमदी यांनी दिली.

अफगाणिस्तानच्या मालकीच्या परकीय चलन भांडारात अमेरिकच्या फेडरल बँकेचे 7 अब्ज डॉलर्सचे रोखे, सोने आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे. परकीय चलनाचा साठा नसल्यास अफगाणिस्तानच्या चलनाचे मूल्य घसरेल आणि देशात महागाई वाढेल. गरीब नागरिकांना याचा मोठा फटका बसेल.

संबंधित बातम्या:

Afghanistan new name : नवा राष्ट्रपती, नवं नाव! अफगाणिस्तानचं नाव बदललं?

अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला

Afghanistan Crisis : अंगावरच्या कपड्यासह बाहेर पडलोय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, पैशांचं तर सोडाच : अशरफ गनी

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.